दिवाळीत 'या' बँका देणार स्वस्तात गृहकर्ज; होणार मोठा फायदा, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 14:58 IST
1 / 9भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज आणि छठ असे अनेक सण येत्या काही दिवसांत साजरे होणार आहेत. या काळात लोक मोठ्या प्रमाणावर घरे आणि कार खरेदी करतात.2 / 9ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना गृहकर्जावर जोरदार ऑफर आणतात. या वर्षीही काही बँकांनी दिवाळीनिमित्त गृहकर्जावर ऑफर आणली आहे. 3 / 9यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदासारख्या बँकांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व बँकांनी दिवाळी २०२३ मध्ये गृहकर्जावर सणाच्या ऑफर सुरू केल्या आहेत.4 / 9धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडियाने खास सण ऑफर आणली आहे. ही विशेष ऑफर १ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान वैध आहे. 5 / 9एसबीआय या विशेष मोहिमेद्वारे ग्राहकांना व्याजदरात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ग्राहकांना क्रेडिट स्कोअरनुसार ०.६५ टक्के म्हणजेच ६५ बेस पॉइंट्सपर्यंत कमाल सवलतीचा लाभ मिळत आहे.6 / 9पंजाब नॅशनल बँक देखील आपल्या ग्राहकांना होम लोनवर जोरदार ऑफर देत आहे. जर तुम्ही या धनत्रयोदशी आणि दिवाळीत बँकेकडून गृहकर्ज घेतले तर बँक ८.४० टक्के दराने गृहकर्ज देत आहे. 7 / 9यासोबतच प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रांवर बँक कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. गृहकर्ज मिळविण्यासाठी, तुम्ही PNB च्या https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही १८०० १८००/१८०० २०२१ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकता.8 / 9बँक ऑफ बडोदाने दिवाळीनिमित्त 'फीलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी' नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे.9 / 9ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध आहे. या फेस्टिव्हल ऑफरद्वारे ग्राहकांना सुरुवातीच्या ८.४० टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. यासोबतच बँक ग्राहकांकडून शून्य प्रक्रिया शुल्क आकारत आहे.