म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 22:48 IST
1 / 7कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाच्या (Canara Robeco Mutual Fund) कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप फंडाने 22 वर्षे पूर्ण केली आहेत. या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत मालामाल केले आहे. 2 / 7सप्टेंबर 2003 मध्ये सुरू झाल्यापासून, कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप फंडातील ₹10,000 प्रति महिन्याची गुंतवणूक (SIP) 29 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढून ₹1.79 कोटींवर पोहोचली आहे. या कालावधीतील एकूण गुंतवणूक रक्कम ₹26.4 लाख एवढी होती, जिने 15.04% चा XIRR प्रदान केला आहे.3 / 7जाणून घ्या सविस्तर - जर एखाद्याने या योजनेच्या सुरुवातीलाच ₹10,000 ची गुंतवणूक केली असती, तर ती रक्कम वाढून आज 29 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढून ₹3.37 लाख रुपयांवर पोहोचली असती. तर बेंचमार्क (BSE 500 TRI) मध्ये हीच गुंतवणूक केवळ ₹2.69 लाखपर्यंतच वाढली. 4 / 7ही एक ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी योजना अथवा स्कीम आहे, जी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करते. हिचा मुख्य उद्देश इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून भांडवल वाढवणे हा आहे. 5 / 7सामान्य परिस्थितीत, फंड आपल्या मालमत्तेच्या 65% ते 100% इक्विटीमध्ये, 0% ते 35% डेब्ट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये, तसेच 0% ते 10% REITs व InvITs मध्ये गुंतवणूक करतो. या योजनेचे व्यवस्थापन श्रीदत्त भंडवालदार (हेड इक्विटीज) आणि प्रणव गोखले (फंड मॅनेजर) करत आहेत.6 / 7दीर्घकालीन SIP मध्ये चक्रवाढ व्याजाची शक्ती दिसून येते. फ्लेक्सी-कॅप फंड बाजारातील अस्थिरता आणि क्षेत्र-विशिष्ट जोखिमांच्या अधीन असतात. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्यायला हवा.7 / 7(टीप - येथे केवळ म्युच्युअल फंडाच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)