By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 10:40 IST
1 / 7आज आम्ही व्यवसायाच्या शोधात असलेल्या लोकांसाठी व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्ही कमी पैसे गुंतवून जास्त पैसे कमवू शकता. हा व्यवसाय बोन्साय प्लांटचा (Bonsai Plant) आहे.2 / 7बोन्साय वनस्पती आजकाल शुभ मानली जाते. या वनस्पतीद्वारे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत की, तुम्ही बोन्सायची लागवड कशी करू शकता आणि यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल? त्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत केली जात आहे.3 / 7बोन्साय शुभ मानल्यामुळे आजकाल त्याचा वापर घर आणि ऑफिसमध्ये सजावटीसाठीही केला जात आहे. त्यामुळेच त्याची मागणीही मोठी आहे. बाजारात त्याची किंमत 200 ते 2500 रुपयांपर्यंत असू शकते. बोन्साय वनस्पती प्रेमींना ती आवडल्यास मागाल तेवढी किंमत मोजायला ते तयार होतात.4 / 7कमी भांडवलात हे काम सुरू करता येते. मात्र, बोन्साय वनस्पती तयार होण्यासाठी दोन ते पाच वर्षांचा कालावधी लागत असल्याने यामध्ये नफा मिळण्यास काही कालावधी लागतो. याशिवाय, रोपवाटिकेतून तयार रोपे आणून 30 ते 50 टक्के अधिक किमतीत विकू शकता.5 / 7हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पाणी, वालुकामय माती, भांडे आणि काचेचे भांडे, जमीन किंवा छप्पर (100 ते 150 चौरस फूट), पातळ वायर, वनस्पतींवर पाणी फवारण्यासाठी स्प्रे बाटली आणि शेड बनवण्यासाठी जाळी लागेल. जर तुम्ही हा व्यवसाय छोट्या प्रमाणावर केला तर तुम्हाला 5 हजार रुपये गुंतवावे लागतील. थोडा मोठा व्यवसाय करण्यासाठी 20 ते 25 हजार लागतील.6 / 7बोन्साय वनस्पती तयार करण्यासाठी तीन वर्षांत सरासरी 240 रुपये खर्च येईल. यामध्ये सरकारकडून प्रति रोप 120 रुपये मदत केली जाईल. 50 टक्के सरकारी मदतीमध्ये 60 टक्के केंद्र आणि 40 टक्के राज्य अशी हिस्सेदारी असेल.7 / 7बोन्साय वनस्पतीच्या गरजेनुसार आणि प्रजातींनुसार तुम्ही एक हेक्टरमध्ये 1500 ते 2500 झाडे लावू शकता. यासह, तुम्हाला 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळेल. विशेष म्हणजे दरवर्षी प्रत्यारोपणाची गरज भासणार नाही.