शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अर्थमंत्रालयातील 'हलवा समारंभ' नेमका काय आहे? कोणाचं तोंड करतात गोड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:21 IST

1 / 5
येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आर्थिक वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक भारतीयाला मोठ्या आशा आहेत. दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी 'हलवा समारंभ' करण्याची ऐतिहासिक परंपरा पार पाडली जाते.
2 / 5
अर्थसंकल्पासाठी १०० हून अधिक सरकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत करत असतात. या काळात त्यांना बाहेर पडता येत नाही. अर्थसंकल्प पूर्ण झाल्यानंतर मंत्रालयात खास हलवा तयार केला जातो. या हलवा या सर्व कर्मचाऱ्यांना वाटण्याची परंपरा आहे.
3 / 5
हलवा समारंभ सुरू झाल्यापासून फक्त २०२२ मध्ये कोविडमुळे रद्द करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात मिठाई देण्यात आली होती.
4 / 5
केंद्रीय अर्थमंत्री आपल्या हाताने या कर्मचाऱ्यांना हलवा वाटतात. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना ही संधी प्राप्त होत आहे.
5 / 5
कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी काहीतरी गोडधोड करावे अशी भारतीय परंपरा आहे. त्याच अनुशंगाने हलवा तयार करुन सर्वांचे तोंड गोड केले जाते.
टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024