अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:41 IST
1 / 6केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला आगामी अर्थसंकल्प २०२५ सादर करतील. सर्वसामान्यांपासून उद्योगपतीपर्यंत अर्थसंकल्पात आम्हाला काय मिळणार? याकडे डोळे लावून बसला आहे. कारण, अर्थसंकल्पात देशाची आर्थिक दिशा ठरवली जाते. आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारमध्ये अनेक अर्थसंकल्प सादर करण्यात आले.2 / 6स्वतंत्र भारतात देशाचा पहिला अर्थसंकल्प १९४७ मघ्ये आरके षणमुखम चेट्टी यांनी सादर केला होता. देशाच्या आर्थिक प्रतिकूल परिस्थितीशी लढण्यासाठी ३१ मार्च १९४८ पर्यंत साडेसात महिन्यांचा हा अंतरिम अर्थसंकल्प होता.3 / 6आतापर्यंतच्या इतिहासात अर्थसंकल्पात सर्वाधिक लांब भाषण करण्याचा विक्रम अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नावावर आहे. २०२० मध्ये त्यांनी सलग २ तास ४२ मिनिटांचे भाषण केलं होतं.4 / 6अर्थसंकल्प काळात 'हलवा समारंभ' हा शब्द कायम चर्चेत येतो. हा एक पारंपारिक समारंभ आहे. यामध्ये दरवर्षी पारंपारिक गोड 'हलवा' तयार केला जातो. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीचा सन्मान म्हणून आजही तो दिला जातो. 5 / 6१९५० मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याआधीच फुटल्याने खळबळ उडाली आहे. अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या नेतृत्वात छपाईच्या प्रक्रियेदरम्यान हा अर्थसंकल्प लीक झाला होता. या घटनेनंतर छपाईची प्रक्रिया राष्ट्रपती भवनातून मिंटो रोडवर हस्तांतरित करण्यात आली. नंतर १९८० मध्ये ती नॉर्थ ब्लॉक तळघरात हलवण्यात आली होती.6 / 6साल १९५५ पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प केवळ इंग्रजीमध्ये छापला जात होता. त्यानंतर १९५५-५६ नंतर वार्षिक आर्थिक दस्तऐवज इंग्रजी आणि हिंदी दोन्हीमध्ये सादर केले जाऊ लागले. ही परंपरा अर्थमंत्री सी.डी.देशमुख यांनी सुरू केली.