Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पाने तुमच्या-आमच्यासाठी काय केला आहे संकल्प?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 06:53 IST
1 / 8लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे.2 / 8शालेय शिक्षणासाठी तरतूद वाढवून ७३ हजार काेटी रुपये करण्यात आली आहे. ‘पीएम-श्री’ शाळांसाठीची तरतूद दाेन हजार काेटी रुपयांनी वाढविण्यात आली आहे. शिक्षणाबाबत इतर कोणतीही मोठी घोषणा नाही.3 / 8अर्थसंकल्पात बेरोजगारांना थेट नोकऱ्यांचे आश्वासन नसले तरी पर्यटन, इलेक्ट्रिक बस, सोलार, विंड न्यूक्लीअर एनर्जी या क्षेत्रांना चालना देण्याच्या अनेक छोट्या-मोठ्या उपायांमुळे रोजगार निर्मिती साधली जाईल.4 / 8पायाभूत सुविधांसाठी विक्रमी तरतूद प्रस्तावित असल्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. पेंशनसंबंधित याेजनेसाठी निधी वाढवला आहे. मनरेगासाठीची तरतूद वाढवण्यात आली आहे. 5 / 8सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ३१२ काेटी आणि प्रशाकीय सुधारणेसाठी १० काेटी रुपयांची तरतूद. नाेकरशाहीत सुधारणा करण्यासाठी ‘मिशन कर्मयाेगी’साठी ८६.१३ काेटी रुपये देणार.6 / 8छोट्या व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी वेगळ्या घोषणा नाहीत. मात्र, शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांनी निकट भविष्यात चालना मिळणार असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले तर त्यांना परताव्याचे पर्याय सापडतील. 7 / 8पर्यटनाला चालना देण्याच्या उपायांमुळे या व्यवसायातील लोकांना थेट फायदा आणि रोजगार निर्माण होण्यास मदत हेईल. स्टार्टअपला चालना देण्यासाठी कर सवलतीची मर्यादा आणखी एका वर्षाने वाढविण्यात आली. 8 / 8तेलबियांच्या उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनविण्याच्या उपायांचा देशातील बीज उद्योगाला लाभ होईल. मात्र, औषध बाजारासाठी काही विशेष तरतुदी नाहीत. कॉर्पोरेट कर ३० वरून २२ टक्क्यांवर आणला आहे.