शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल? मिळताहेत असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 7:52 AM

1 / 9
लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
2 / 9
अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करीत होते. आता सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८ हजारांवरून वाढून २६ हजार रुपये होऊ शकते.
3 / 9
आठव्या वेतन आयोगासंबंधी सरकार महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा या बजेटमध्ये करू शकते. यामुळे कनिष्ठ पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल. त्यांचेही वेतन वाढू शकते.
4 / 9
दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो. कोरोनाकाळात या भत्त्यात वाढ केली नव्हती. त्या १८ महिन्याच्या काळातील महगाई भत्त्याची थकबाकी दिली जाऊ शकते.
5 / 9
निवडणुुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ६ हजार असलेला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ९ हजारांपर्यंत वाढविण्याचा अंदाज आहे. महिला शेतकऱ्यांना हा सन्माननिधी प्रतिवर्ष १२ हजार रुपये करण्याचा अंदाज आहे.
6 / 9
सर्वच कंपन्या मिळणाऱ्या नफ्यावर कर भरीत असतात; परंतु सरकार शेअरधारकाला मिळणाऱ्या लाभांशावर कर लावते. या दुहेरी कर आकारणीतून शेअरधारकाची सुटका दिली जाऊ शकते.
7 / 9
सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी निवृत्तिवेतनाची मर्यादा वाढवू शकते. सध्या दिली जात असलेली रक्कम पुरेशी नसल्याने अटल पेन्शन योजनेत वाढ केली जाऊ शकते.
8 / 9
निवृत्त वरिष्ठ नागरिकांचा आरोग्य उपचार, औषधे यासाठी होणारा अधिकचा खर्च पाहता सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून एन्युटींना करमुक्त दर्जा देऊ शकते.
9 / 9
चालू वर्षातील वित्तीय तूट ५.९० टक्के आहे. २०२४ च्या अखेरीपर्यंत ही तूट जीडीपीच्या तुलनेत ४.५० टक्केपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. भांडवली खर्च पुढील वर्षी ११.५० ट्रिलियन होण्याचा अंदाज आहे.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनCentral Governmentकेंद्र सरकार