1 / 7भारत आणि पाकिस्तान संघर्षादरम्यान आणखी २ देश भारतीयांच्या रडावर आले आहेत. ज्यांनी पाकिस्तानला या लढाईत मदत केली. एक आपला शेजारी चीन तर दुसरा तुर्कस्थान आहे. 2 / 7तुर्कीमधून अनेक वस्तू भारतात आयात केल्या जातात. पण, तुर्कीने शत्रूला मदत केल्याने आता बायकॉट तुर्की मोहिम सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.3 / 7या मोहिमेचा परिणाम भारतात लगेच दिसून येत आहे. Ixigo आणि EaseMyTrip सारख्या अनेक ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मनी तुर्कीसाठी फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग थांबवले आहेत. पण प्रकरण इथेच थांबले नाही. भारतीय व्यापाऱ्यांनीही तुर्कस्थानातून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. परिणामी, तुर्की सफरचंद आता बाजारातून जवळजवळ गायब झाले आहेत.4 / 7सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Boycott Türkiye हा हॅशटॅग देखील ट्रेंड करत आहे. यामध्ये लोक उघडपणे आपले विचार व्यक्त करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, भारताने तुर्कीला त्याच्या कठीण काळात साथ दिली, पण जेव्हा भारताच्या पाठीशी उभे राहण्याची गरज होती, तुर्कस्थान तुर्की तिथे नव्हते.5 / 7तुर्कस्थानमधील सफरचंदावर बहिष्कार टाकल्यानंतर इराणमधून येणाऱ्या सफरचंदांची मागणी वाढली आहे. यामुळे १० किलो सफरचंदांचा घाऊक भाव २०० ते ३०० रुपयांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारातही सफरचंद २० ते ३० रुपयांनी महाग झाले आहेत. भारतीय व्यापारी आता तुर्कस्थान सफरचंदांऐवजी इराणी, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधील सफरचंदांना प्राधान्य देत आहेत.6 / 7तुर्कस्थानमधून खनिज तेल आणि इंधन, यंत्रसामग्री, बॉयलर आणि त्यांचे भाग, मीठ, प्लास्टर साहित्य (जसे की संगमरवरी), अजैविक रसायने, मौल्यवान खडे आणि धातू, फळे आणि काजू (सफरचंद, चेरी, हेझलनट) भारतात आयात केले जातात.7 / 7खाद्य पदार्थ (बकलावा, हेझलनट, ऑलिव्ह ऑइल इ.), कापड आणि कपडे (कॉटन, एलसी वायकीकी सारखे तुर्की ब्रँड भारतात लोकप्रिय आहेत) इत्यादी वस्तू तुर्कस्थानातून आयात केले जातात. गेल्या आर्थिक वर्षात भारताने तुर्कस्थानातून सफरचंदांपैकी ५०% अतिरिक्त आयात केली.