1 / 11प्रमुख एक्स्प्रेस ल़़ॉजिस्टिक सेवा देणारी कंपनी ब्लू डार्टनं (Blue Dart) गुरूवारी ब्लू डार्ट मेड-एक्स्प्रेस कंसोर्टियमची (Blue Dart Med-Express Consortium) स्थापना केल्याची माहिती दिली. 2 / 11या अंतर्गत कंपनी भारतातील दुर्गम भागांमध्ये ड्रोनच्या सहाय्यानं लस आणि आपात्कालिन औषधांचा पुरवठा करणार आहे. 3 / 11ब्लू डार्ट मेड एक्स्प्रेस कंसोर्टियम तेलगण सरकार, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, नीति आयोग आणि हेल्थनेट ग्लोबल यांनी सुरू केलेल्या मेडिसिन फ्रॉम द स्काय यो मोहिमेचा भाग असल्याचं कंपनीनं सांगितलं. 4 / 11नागरी उड्डाण मंत्रालयानं तेलंगणमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या ड्रोनच्या उड्डाणांसाठी सूट देण्यासह या योजनेला मंजुरीही दिली आहे. 5 / 11या योजनेचा उद्देश वितरण केंद्रांपासून विशिष्ट स्थानापर्यंत आरोग्य संबंधी वस्तू (औषधे, करोना प्रतिबंधात्मक लसी, रक्ताचे नमूने आणि अन्य वैद्यकीय उपकरणं) पोहोचवण्यासाठी एक पर्यायी लॉजिस्टिक मार्ग तयार करणं हा असल्याचं पत्रकाद्वारे सांगण्यात आलं. 6 / 11Blue Dart Med-Express चं ड्रोन उड्डाण immersive delivery mode चा वापर करणार आहे. 7 / 11याद्वारे मेडिकल स्टोर्स आणि ब्लड बँककडून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक वस्तू पुरवल्या जातील. 8 / 11याच प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून सामुदायिक आरोग्य केंद्रांकडे सेंट्रल डायग्नोस्टिक लॅबोरेटरीजला पुरवठा केला जाईल. 9 / 11आम्ही कायमच भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या महासाथीच्या काळातही आमचा हा प्रवास थांबला नाही, अशी प्रतिक्रिया ब्लू डार्टचे व्यवस्थापकीय संचालक बेलफोर मॅन्युअल यांनी दिली. 10 / 11तेलंगण अशा राज्यांपैकी एक आहे जे तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्रिय आहे, अशी प्रतिक्रिया तेलगणचे प्रिन्सिपल सेक्रेटरी (आयटी अँड इंडस्ट्रिज) यांनी दिली. 11 / 11मेडिसिन फ्रॉम स्काय या योजनेत याच सिद्धांतावर ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. हा देशात अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. ग्रामीण भागांपर्यंत सेवा पोहोचवणं यामागील उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं.