शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar Card बाबत मोठी अपडेट, मोफत अपडेट करण्यासाठी उरलेत केवळ ८ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 9:36 AM

1 / 7
Free Aadhaar Update: जर तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते १४ मार्च २०२४ पर्यंत करू शकता. तुमच्याकडे आता केवळ ८ दिवस बाकी आहेत. जर तुम्हाला मोफत आधार अपडेट करायचं असेल तर कमी वेळ शिल्लक आहे.
2 / 7
बँक खाते उघडणं, सरकारी योजनांचा लाभ घेणं, सिमकार्ड खरेदी करणं, घर खरेदी करणं इत्यादी पैशाशी संबंधित सर्व कामांसाठी आधार आवश्यक झालं आहे. अशा परिस्थितीत आधार कार्ड वेळोवेळी अपडेट न केल्यास अनेक कामं रखडण्याची शक्यता आहे.
3 / 7
तुम्ही आधार केंद्रावर जाऊन किंवा स्वत:हून आधार ऑनलाइन अपडेट करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, ग्राहकांना त्यांचा डेमोग्राफिक डेटा, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती द्यावी लागेल. आधारचा बहुतेक डेमोग्राफिक डेटा स्वतःहून ऑनलाइन अपडेट केला जाऊ शकतो, परंतु अशाही काही गोष्टी आहेत, ज्यासाठी तुम्हाला फक्त आधार केंद्रावर जावे लागेल.
4 / 7
उदाहरणार्थ, आयरिस किंवा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावं लागेल. हे लक्षात ठेवा की मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटवर उपलब्ध असेल. आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन शुल्क भरावं लागेल.
5 / 7
ऑनलाइन मोफत आधार अपडेट करण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर आधार अपडेटचा पर्याय निवडावा लागेल. जर तुम्हाला अॅड्रेस अपडेट करायचा असेल तर त्यात अॅड्रेस हा पर्याय निवडा.
6 / 7
नंतर रजिस्टर मोबाइल क्रमांक टाकून ओटीपी एन्टर करा. यानंतर तुम्हाला Documents Update हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर पुढे तुम्हाला आधारशी निगडीत डिटेल्स दिसतील. सर्व डिटेल्स व्हेरिफाय कर आणि अॅड्रेस अपडेट करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
7 / 7
यानंतर अपडेटला ओके करा, या प्रक्रियेनंतर तुम्हाला एक १४ अंकांचा अपडेच रिक्वेस्ट नंबर मिळेल. याद्वारे तुम्ही आधार अपडेटची प्रक्रिया ट्रॅक करू शकता.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डGovernmentसरकार