1 / 6रिलायन्सची पायाभरणी धीरूभाई अंबानी यांनी केली. मुकेश अंबानी १९८१ मध्ये आणि अनिल अंबानी १९८३ मध्ये रिलायन्सशी जोडले गेले होते. जुलै २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांना रिलायन्स समूहाचे अध्यक्ष करण्यात आलं. तर अनिल अंबानी व्यवस्थापकीय संचालक झाले. 2 / 6काही वर्षांतच दोन्ही भावांमध्ये वाद सुरू झाला. मुकेश आणि अनिल अंबानी यांनी रिलायन्सची जबाबदारी स्वीकारली, त्यावेळी दोन्ही भावांची संयुक्त नेटवर्थ २.८ अब्ज डॉलर्स होती. तर २००४ मध्ये ती ६ अब्ज डॉलरवर पोहोचली आणि २००५ मध्ये ती ७ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. 3 / 6२००५ मध्ये रिलायन्सचा व्यवसाय दोघांमध्ये विभागला गेला. अनिल अंबानी यांच्याकडे आरकॉम, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स एनर्जी, रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस सारख्या कंपन्यांचा समावेश होता. अनिल अंबानी आपल्या चुकांमुळे कर्जाच्या जाळ्यात अडकले. पुढेही अनिल अंबानी कर्जाच्या जाळ्यात अडकत गेले आणि त्यांनी स्वत:ला दिवाळखोर घोषित केलं.4 / 6मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीना अंबानी यांची नेटवर्थ जवळपास २३३१ कोटी रुपये आहे. टीना अंबानी या मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय, हार्मोनी फॉर सिल्व्हर फाऊंडेशन आणि हार्मोनी आर्ट फाऊंडेशनच्या अध्यक्ष आहेत. याशिवाय त्या अनेक फाऊंडेशन आणि धर्मादाय संस्थांमध्ये सक्रियपणे काम करतात. अनिल अंबानी आज अनेक प्रकरणांमध्ये अडकले आहेत आणि त्यांनी स्वत:ला दिवाळखोर घोषित केलंय.5 / 6हिंदुजा समूहाच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सनं (आयआयएचएल) कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. 6 / 6आयआयएचएलचे अध्यक्ष अशोक हिंदुजा म्हणाले की, कंपनीनं बँकेतील आपला हिस्सा १५ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी आवश्यक नियामक औपचारिकता पूर्ण केली आहे. टप्प्याटप्प्यानं हा हिस्सा वाढविण्यात येणार आहे. विमा नियामक आयआरडीएनं या कराराला मंजुरी देताच बँकांची थकबाकी भरली जाईल, असं हिंदुजा यांनी सांगितलं.