शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:18 IST

1 / 8
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांसोबत टॅरिफ वॉर छेडत त्या देशांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या बलाढ्या असण्याचा पुरेपुर फायदा ट्रम्प घेत आहेत. भारतासोबतही ट्रम्प ट्रेड डील करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच चीनलाही झुकविलेल्या ट्रम्प यांनी आणखी एका छोट्या परंतू बलाढ्य देशाला झुकण्यास भाग पाडले आहे. या व्यापारी समझोत्याला ट्रम्प यांनी इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी डील असल्याचे जाहीर केले आहे.
2 / 8
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानसोबत व्यापार कराराची घोषणा केली आहे. यामध्ये केवळ १५ टक्के टेरिफ आकारले जाणार असून जपान या बदल्यात अमेरिकेत ५५० अब्ज डॉलर्स (सुमारे ५५,००० कोटी डॉलर्स) गुंतवणूक करणार आहे. गेल्याच महिन्यात भारताने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले होते. आता अमेरिकेने या देशाला झुकायला भाग पाडले आहे.
3 / 8
जपान अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याने तिथे लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जपानचा ऑटो मोबाईल बाजार खूप मोठा आहे. या डीलमुळे जपानी कंपन्यांना अमेरिकेत प्रकल्प उभारावे लागण्याची शक्यता आहे.
4 / 8
या डीलमुळे जपान अमेरिकेत अब्जावधी डॉलर्स गुंतवणार तर आहेच, शिवाय अमेरिकी कार कंपन्यांच्या कार, तांदूळ आणि कृषी उत्पादनांसाठी जपानी बाजाराचे दरवाजे सताड उघडले जाणार आहेत. याच्या बदल्यात जपानच्या वस्तूंवर अमेरिकेत केवळ १५ टक्केच कर लागणार आहे.
5 / 8
यामुळे अमेरिकेतील कंपन्या, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे. लाखो नोकऱ्या निर्माण होतील ज्यामुळे अमेरिकेला ९० टक्के फायदा कमवता येणार आहे.
6 / 8
अमेरिकेला भारतासोबतही अशीच डील करायची आहे. अमेरिकेला भारतात त्यांची कृषी उत्पादने, दूध आदी गोष्टी विकायच्या आहेत. कृषीप्रधान देशाला कृषी उत्पादने विकून भारतातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याचा डाव अमेरिका आखत आहे. एवढेच नाही तर मांसाहारी दूध विकले जाणार आहे, यालाही लोकांचा प्रचंड विरोध होत आहे.
7 / 8
सरकारनेही या गोष्टींनी विरोध केल्याने गेल्याच महिन्यात अमेरिकेसोबतची व्यापार डील लांबणीवर पडली होती. आता ही डील सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. आता भारत ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकतो की अमेरिकेला झुकवतो याकडे उद्योगविश्वच नाही तर सामान्य शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
8 / 8
अमेरिका येत्या १ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २० ते २६ टक्के कर लादण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टीमेटमनुसार ही डील पूर्णत्वास आलेली नाही.
टॅग्स :AmericaअमेरिकाJapanजपानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प