1 / 7Anant Ambani Radhika Merchant Wedding: रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश, यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात असलेल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. या आलिशान सोहळ्यात देश विदेशातील शेकडो पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 2 / 7अंबानी कुटुंबातील या शाही लग्न सोहळ्यामुळे मुंबईतील मोठमोठ्या हॉटेल्सची मागणीदेखील वाढली आहे. बीकेसी भागातील बहुतांश फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या खोल्या बुक झाल्या आहेत. ट्रॅव्हल आणि हॉटेल बुकिंग वेबसाइट्सनुसार, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात अशी दोन पंचतारांकित हॉटेल्स आहेत, जिथे सर्व खोल्या आधीच बुक झाल्या आहेत.3 / 7 यातील एका हॉटेलमध्ये 14 जुलै रोजीचे, म्हणजेच एका दिवसाचे भाडे तब्बल ₹91,350+Tax रुपयांवर पोहोचले आहे. इतर दिवशी या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी फक्त ₹13,000 रुपये मोजावे लागतात. 4 / 7 BKC मधील प्रसिद्ध हॉटेल ट्रायडेंट मध्ये सिंगल रुमचे एका रात्रीचे दर 9 जुलै रोजी ₹10,250+tax, 15 जुलै रोजी ₹16,750+Tax आणि 16 जुलै रोजी ₹13,750+ Tax दाखवत आहे.5 / 7 तसेच, 10 जुलै ते 14 जुलै पर्यंत एकही खोली उपलब्ध नाही. पण, या तारखांना ग्रँड हयात, ताज सांताक्रूझ, ताज बांद्रा आणि सेंट रेजिस सारख्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये 14 जुलैपर्यंत रुम्स उपलब्ध आहेत. 6 / 7 12 जुलैपासून अनेक सेलिब्रिटी या भव्य विवाह सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अनंत आणि राधिकाचे लग्न 12 जुलैला असून, 12 जुलै रोजी आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी रिसेप्शन आयोजित केले आहे. 7 / 7 लग्नातील पाहुणे नेमकं कुठे राहतील, याची अधिकृत माहिती समोर आली नाही. पण, BKC आणि आसपासच्या भागातील हॉटेलचे दर वाढल्यामुळे, याच हॉटेल्समध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याची शक्यता आहे.