शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुकेश अंबानी आणि गौतम अदानींना मोठा झटका; 100 अब्ज डॉलर्स क्लबमधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:51 IST

1 / 6
Ambani-Adani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणले जाणारे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर पडले आहेत. अलिकडच्या काही महिन्यांत या दोघांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड घसरणीमुळे श्रीमंतांच्या यादीत दोन्ही उद्योगपती खूप खाली आले आहेत.
2 / 6
मुकेश अंबानींची संपत्ती का घटली? मुकेश अंबानी यांची संपत्ती जुलै 2024 मध्ये $120.8 अब्ज होती, जी आता डिसेंबर 2024 मध्ये $96.7 बिलियन झाली आहे. ही घसरण प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल आणि ऊर्जा विभागांची कमकुवत कामगिरी आणि वाढत्या कर्जामुळे झाली आहे. कंपनीच्या व्यवसाय विस्ताराबाबत गुंतवणूकदारांमध्येही चिंता वाढली आहे.
3 / 6
गौतम अदानी यांनाही झटका- गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट होण्यामागे यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (डीओजे) चा तपास आणि हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाचा मोठा वाटा आहे. हिंडेनबर्ग अहवालातील फसवणुकीच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या प्रतिमेला खूप तडा गेला. जून 2024 मध्ये अदानींची संपत्ती 122.3 अब्ज डॉलर्स होती, जी आता डिसेंबर 2024 मध्ये केवळ 82.1 अब्ज डॉलर्सवर आली आहे.
4 / 6
ठोस पावले उचलावी लागतील- मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेली घसरण भारतीय उद्योगासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. दोन्ही उद्योगपतींना त्यांचे व्यावसायिक साम्राज्य स्थिर करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलावी लागतील, असे गुंतवणूकदार आणि उद्योग तज्ज्ञांचे मत आहे.
5 / 6
भारताच्या टेलिकॉम उद्योगावर दबाव- ब्लूमबर्गच्या अहवालात भारतीय टेलिकॉम कंपन्यांच्या संभाव्य धोक्याबात माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे आणि इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचा भारतात प्रवेश, यामुळे दूरसंचार क्षेत्रात नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात.
6 / 6
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबे- ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत वॉलमार्टचे वॉल्टन कुटुंब 2024 मध्ये $432.4 अब्ज संपत्तीसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी मध्य-पूर्वेतील शाही कुटुंबे आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनाही मागे सोडले आहे. तर, अंबानी आणि मिस्त्री कुटुंबे, या यादीत अनुक्रमे आठव्या आणि तेविसाव्या क्रमांकावर आहेत. अदानींना या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे, या यादीमध्ये पहिल्या पिढीतील उद्योगपतींचा समावेश केला जात नाही.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीGautam Adaniगौतम अदानीbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक