लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 09:22 IST
1 / 10आतापर्यंतच्या ५%, १२%, १८% आणि २८% अशा चार स्लॅब्सऐवजी आता देशात दोनच करदर राहतील, ते म्हणजे ५% आणि १८%. पण, काही निवडक वस्तूंवर आणि सेवांवर ४०% विशेष करदर लागू करण्यात आला आहे. 2 / 10हा दर आधी आकारल्या जाणाऱ्या कंपेन्सेशन सेसच्या जागी आणण्यात आला आहे. जीएसटी कपातीनंतर बहुतांश वस्तुंवरील दर कमी होणार आहेत परंतु काही निवडक वस्तू आहेत ज्यांचे दर महागणार आहेत. 3 / 10करदराखाली महाग होणाऱ्या वस्तू/सेवा - हॉटेलिंग : वातानुकूलित व प्रीमियम रेस्टॉरंटमधील जेवण, ग्राहकोपयोगी वस्तू : फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, ब्युटी व ग्रुमिंग : सलून, स्पा, प्रीमियम स्मार्टफोन्स व आयातीत गॅजेट्स4 / 10आरोग्य व समाजासाठी घातक मानल्या जाणाऱ्या वस्तूंवर सर्वाधिक ४०% कर बसणार आहे. सीन गुड्स : सिगारेट, पान मसाला, गुटखा, विडी, तंबाखू, तंबाखूजन्य पावडर, सिगार, सिगारिलोस, हुक्का, ऑनलाइन जुगार व गेमिंग सेवा.5 / 10लक्झरी कार्स : १,२०० सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता आणि ४ मीटरपेक्षा लांबी असलेल्या गाड्यांवर ४०% जीएसटी लागणार आहे. ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेली दुचाकी वाहने : यावर आता ४०% जीएसटी लागेल. आधी २८% जीएसटी ३% सेस होता. 6 / 10सॉफ्ट ड्रिंक्स व शीतपेये : कोका-कोला, पेप्सी, फॅण्टा, माऊंटन ड्यूसारखी सॉफ्ट ड्रिंक्स आता ४०% कर दराखाली येतील. नवे वस्तू व सेवा कर (जीएसटी) दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. नव्या रचनेनुसार फक्त दोनच मुख्य दर राहतील ५ टक्के आणि १८ टक्के. 7 / 10काही दैनंदिन गरजेच्या वस्तू व सेवांच्या किमती कमी झाल्याने घरखर्चाला थोडा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, मनोरंजन, लक्झरी व जीवनशैलीशी संबंधित वस्तू व सेवांचे दर वाढणार असल्याने अनेकांना खर्च आटोक्यात ठेवावा लागेल. 8 / 10वस्तूंवरील एमआरपी नीट तपासणे का आवश्यक आहे? - ग्राहक व्यवहार विभागाने कंपन्यांना जीएसटी बदल लागू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र, स्थानिक दुकाने व विक्रेत्यांमध्ये काही प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता आहे. 9 / 10२२ सप्टेंबरपूर्वी तयार केलेल्या उत्पादनांवर जुनी व सुधारित अशी दोन्ही एमआरपी दिसू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या बिस्कीट पॅकची जुनी एमआरपी ५० रुपये असेल आणि आता ती ४८ रुपये केली असेल, तरी काही दुकानदार अजूनही ५० रुपये आकारू शकतात.10 / 10आधीच उत्पादन तयार असल्यास काय करावे लागेल? - कंपन्यांना आता फक्त नवीन दरांची यादी वितरकांना द्यायची असून त्याची प्रत कायदेशीर मापनशास्त्र विभागाला द्यावी लागेल. जुनी पॅकेजिंग ३१ मार्च २०२६ पर्यंत वापरता येईल आणि दरातील बदल स्टिकर, शिक्का किंवा डिजिटल प्रिंटिंगद्वारे दाखवता येतील.