Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 09:18 IST
1 / 9Aadhaar Card Update New Charges: जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल, तर ते काम ३० सप्टेंबर २०२५ म्हणजेच आजपर्यंत पूर्ण करा, कारण १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार कार्डमध्ये कोणत्याही बदलासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावं लागेल. 2 / 9युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डशी संबंधित अनेक नवे नियम जारी केले आहेत, जे १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होतील. हे बदल केवळ अपडेट प्रक्रिया आणि शुल्कावरच परिणाम करणार नाहीत, तर तुमच्या आधार कार्डवर दिसणाऱ्या काही महत्त्वपूर्ण माहितीमध्येही बदल करतील.3 / 9१ ऑक्टोबर २०२५ पासून आधार कार्डमध्ये सामान्य सुधारणांसाठी (जसे की नाव किंवा पत्ता), ७५ रुपये शुल्क लागेल. जर तुम्हाला बायोमेट्रिक माहिती (जसं की फिंगरप्रिंट, आयरीस किंवा फोटो) बदलायची असेल, तर त्यासाठी १२५ रुपये भरावे लागतील. मुलांच्या (७ ते १७ वर्षे) बायोमेट्रिक अपडेटसाठी देखील आता १२५ रुपये शुल्क लागेल. मात्र, नवं आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नाही, ते पूर्वीप्रमाणेच विनामूल्य राहील.4 / 9UIDAI चे सीईओ, भुवनेश्वर कुमार यांच्यानुसार, १ ऑक्टोबर २०२५ पासून १० वर्षांपेक्षा जुनं आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असणार आहे. ज्यांनी गेल्या दहा वर्षांत आपले आधार अपडेट केले नाही, त्यांना आता आपले दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) जमा करून हे नवं शुल्क भरावं लागेल, ज्यामुळे ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा एक अतिरिक्त खर्च असू शकतो.5 / 9एक चांगली बातमी ही आहे की, ५ ते ७ वर्षे वयोगटातील मुलं आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी आता बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. आधी हे शुल्क ५० रुपये होते, जे आता माफ करण्यात आलं आहे. मात्र, या वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य आहे. ते वेळेवर न केल्यास त्यांचे आधार कार्ड अवैध होऊ शकतं.6 / 9१५ ऑगस्ट २०२५ पासून, नव्या आधार कार्डवर १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी वडिलांचं किंवा पतीचं नाव दिसणार नाही. ही माहिती केवळ UIDAI च्या रेकॉर्डमध्येच राहील. या बदलामुळे वारंवार नाव बदलण्याची गरज भासणार नाही आणि लोकांची गोपनीयता (प्रायव्हसी) सुरक्षित राहील, विशेषतः महिलांसाठी हे एक मोठं पाऊल आहे.7 / 9आता तुमच्या आधार कार्डवर जन्मदिनांक केवळ वर्ष (उदा. १९९०) या स्वरूपात दिसेल, तर संपूर्ण जन्मदिनांक (उदा. ०१/०१/१९९०) UIDAI च्या रेकॉर्डमध्ये राहील. याव्यतिरिक्त, कार्डमधून ‘केअर ऑफ’ (C/o) कॉलम काढून टाकण्यात आला आहे. आता तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमचं नाव, वय आणि पत्ता एवढीच माहिती दिसेल.8 / 9जानेवारी २०२५ पासून पत्ता बदलण्यासाठी केवळ बँक स्टेटमेंट किंवा युटिलिटी बिल (वीज, पाणी, गॅस बिल) स्वीकारले जातील. नाव किंवा जन्म दिनांकासारख्या इतर सुधारणांसाठी पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) किंवा जन्म प्रमाणपत्र (बर्थ सर्टिफिकेट) वैध असतील. 9 / 9१ ऑक्टोबर २०२५ पासून अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल. याचा अर्थ तुम्ही UIDAI च्या वेबसाइट (uidai.gov.in) किंवा mAadhaar ॲपवर रिक्वेस्ट सबमिट करून जवळच्या आधार केंद्रावर आपले दस्तऐवज व्हेरिफाय करू शकता. यानंतर अपडेट ऑनलाईनच होईल. हे सर्व बदल लोकांना आधार अपडेट करण्यात सुविधा देण्यासाठी आणि कार्डची माहिती अधिक सुरक्षित करण्यासाठी केले जात आहेत.