लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
३ वेळा बोनस देणाऱ्या सरकारी कंपनीनं गुंतवणूकदारांचं नशीब बदललं, १ लाखांचे झाले ४५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:17 IST
1 / 5शेअर बाजारात धोका आहे, तसं त्यात अनेक संधीही मिळतात. कोणता शेअर कोणत्या वेळी कमाल करून जाईल सांगता येत नाही. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेट ही एक सरकारी कंपनी आहे. यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब बदललंय. कंपनीनं ३ बोनस शेअर दिल्यानंतर आता गुंतवणूकदारांच्या १ लाखांचे ४५ कोटी रुपये झाले आहेत. 2 / 5कंपनीचे शेअर्स सोमवारी ०.४० टक्क्यांच्या तेजीसह १००.३० रुपयांवर बंद झाला. १ जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये ४५,४९०.९१ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. या सरकारी कंपनीनं २:१, १:१० आणि २:१ असे तीन वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.3 / 5१९९९ मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी यात १ लाख रुपये गुंतवले असतील त्यांना आतापर्यंत ४,५४,५४५ शेअर्स मिळाले असतील. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटनं पहिल्यांदा १४ सप्टेंबर २०१५ रोजी बोनस शेअर्स दिले होते.4 / 5यानंतर दोन वर्षांनी २८ सप्टेंबर २०१७ रोजी कंपनीनं पुन्हा १:१० बोनस शेअर्स दिले. त्यानंतर कंपनीनं पुन्हा एकदा २:१ असे बोनस शेअर्स दिले होते. जर कोणी १९९९ रोजी यात गुंतवणूक केली असेल आणि ती कायम ठेवली असेल तर त्याच्या शेअर्सची संख्या ४४,९९,९९४ झाली असेल.5 / 5जर सोमवारच्या हिशोबानं किंमत पाहिली तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्यांच्या १ लाख रुपयांचे ४५ कोटी रुपये झाले आहे. कंपनीचं मार्केट कॅप सध्या ७३,२८० कोटी रुपये आहे. (टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा.)