म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
भारतातील १० सर्वात श्रीमंत Youtubers, ज्यांची कमाई बॉलिवूड स्टार्सपेक्षाही आहे जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:43 IST
1 / 11Richest Youtubers In India: गेल्या काही वर्षांपासून अनेक जण कामाईसाठी यूट्युबकडे वळू लागलेत. पण अनेक वर्षांपासून काही यूट्युबर्सनं यात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. गौरव चौधरी (टेक्निकल गुरुजी), भुवन बाम, अमित भडाना, कॅरीमिनाती, निशा मधुलिका, संदीप माहेश्वरी, खान सर, आशिष चंचलनी, हर्ष बेनीवाल आणि ध्रुव राठी हे भारतातील टॉप यूट्यूबर्स आहेत. हे यूट्यूबर्स त्यांच्या उत्तम कमाई, लोकप्रियता आणि क्रिएटिव्ह कंन्टेंटसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यांची नेटवर्थ कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. त्यांच्या कमाईचे आकडे पाहून तुम्ही अवाक् व्हाल.2 / 11टेक्निकल गुरुजी (गौरव चौधरी) - कल गुरुजी' या नावानं ओळखला जाणारा गौरव चौधरी हा यूट्युबवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय यूट्यूबर्सपैकी एक असून त्याचे २३.७ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण नेटवर्थ ३५६ कोटी रुपये आहे, ज्यामुळे तो भारतातील सर्वाधिक कमाई करणारा यूट्यूबर बनलाय. 3 / 11भुवन बाम - 'बीबी की वाइन' या नावानं प्रसिद्ध असलेल्या भुवन बामचे यूट्यूबवर २६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याची एकूण संपत्ती १२२ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. भुवन बाम केवळ यूट्यूब व्हिडिओच बनवत नाही तर त्याच्या 'ताजा खबर' सारखे म्युझिक व्हिडिओ आणि शोदेखील प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. 4 / 11अमित भडाणा - याच्या युट्यूब चॅनेलवर २४.५ मिलियन सबस्क्रायबर्स असून त्याची नेटवर्थ ८० कोटी रुपये आहे. तो त्याच्या कॉमेडी व्हिडिओ आणि मजेशीर कन्टेंटसाठी ओळखला जातो. 5 / 11कॅरीमिनाटी - हा यूट्यूबच्या सर्वात लोकप्रिय कन्टेंट क्रिएटर्सपैकी एक आहे, ज्याचे ४४.९ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. मात्र, त्याची नेटवर्थ ५० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. तो मीम्स आणि रिअॅलिटी व्हिडीओ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 6 / 11निशा मधुलिका - यांचे यूट्यूबवर १४.६ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. त्यांची नेटवर्थ ४३ कोटी रुपये आहे आणि त्या भारतीय कुकिंग चॅनेलच्या सर्वात लोकप्रिय यूट्यूबर आहे. 7 / 11संदीप माहेश्वरी - मोटिव्हेशनल स्पीकर आणि फोटोग्राफर संदीप माहेश्वरी यांचे यूट्यूब चॅनेलवर २८.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याची नेटवर्थ ४१ कोटी रुपये असून ते पर्सनल डेव्हलपमेंट आणि मोटिव्हेशनल व्हिडीओसाठी प्रसिद्ध आहेत. 8 / 11खान सर - खान सर या नावानं प्रसिद्ध असलेल्या फैजल खान हे ४१ कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. शिक्षण आणि सरकारी परीक्षांशी संबंधित सामग्रीसाठी ते खूप लोकप्रिय आहेत. 9 / 11आशीष चंचलानी - आशिष चंचलानी याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांची संपत्ती ४० कोटी रुपये आहे. तो त्याच्या कॉमेडी व्हिडीओसाठी खूप प्रसिद्ध आहे. 10 / 11 हर्ष बेनिवाल - हर्ष बेनीवाल याचे व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. त्याची नेटवर्थ ३० कोटी रुपये असून तो कॉमेडी व्हिडिओ बनवण्यासाठी लोकप्रिय आहे. 11 / 11ध्रुव राठी - आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर व्हिडीओ बनवणाऱ्या ध्रुव राठी याची एकूण संपत्ती २४ कोटी रुपये आहे. तो यूट्यूबवर खूप लोकप्रिय आहे.