नेहा कक्कड अडकणार लग्नबेडीत? इंस्टाग्रामवर याबाबत केला तिने खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 06:57 PM2020-09-01T18:57:35+5:302020-09-01T19:12:06+5:30

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

गायिका नेहा कक्कड प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत राहते. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. आता तिच्या एका पोस्टमधून ती लग्न करणार असल्याची हिंट मिळते आहे. 

खरेतर नेहा कक्कडने इंस्टाग्राम स्टोरीवर काही लिहिले आहे. तिने लिहिले की, चल लॉकडाउनमध्ये लग्न करूयात खर्च कमी होईल. (Aaja chal vyaah karwaiye lockdown vich katt hone kharche.)

नेहाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते ती लग्न करणार असल्याचे बोलत आहेत. मात्र असे काही नाही. 

खरेतर हे तिने तिच्या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी पोस्ट केली होती. तिने जी लाइन टाकली होती ती तिच्या डायमंड दा छल्लामधील आहे.

नेहाचे हे गाणे 26 ऑगस्टला रिलीज झाले आहे. या गाण्यात तिने एक्टिंग आणि डान्सदेखील केला आहे.

तिच्या या नवीन गाण्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

या वर्षी जूनमध्ये नेहा कक्कडचे इंस्टाग्रामवर 40 मिलियन फॉलोव्हर्स झाले आहेत.