Bhumi Pednekar: मी खूपच रोमॅन्टिक, ३-४ मुलांची आई व्हायचंय; लग्नाच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं बिनधास्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 07:56 PM2021-08-21T19:56:55+5:302021-08-21T20:05:28+5:30

भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एका कार्यक्रमात तिच्या पर्सनल लाईफबद्दल विचारण्यात आलं.

भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar) हिला बॉलिवूडमध्ये येऊन सहा वर्ष झाली. तिने विविध सिनेमांमध्ये आव्हानात्मक भूमिका निभावल्या आहेत. अभिनयाच्या जोरावर भूमीनं स्वत:ची खास ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. एका मुलाखतीत भूमीनं तिच्या खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल लाइफबद्दल अनेक हटके खुलासे केले आहेत.

इंडिया टूडेच्या एका कार्यक्रमात भूमी पेडणेकर पोहचली होती. त्यावेळी तिला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले तेव्हा तिने बेधडक उत्तरं दिली. लग्नानंतर तिला किती मुलांची आई व्हायचं आहे या प्रश्नावर तिचं उत्तर सध्या भलतंच चर्चेत आहे.

भूमी म्हणते, मी खूपच रोमॅन्टिक आहे. मी लग्नावर विश्वास ठेवते. माझी इच्छा आहे की, एकेदिवशी माझी ३-४ मुलं असावीत. भूमी पेडणेकरच्या या बिनधास्त उत्तरानं ती चर्चेत आली आहे.

लग्नाबाबत भूमी पेडणेकरने तिचे विचार मांडले. ती म्हणाली की, लग्नाबाबत माझे काही विचार आहेत. त्याच्याशी मी कधीही तडजोड करणार नाही. जर मला माझ्या आवडीच्या गोष्टी मिळाल्या तरच मी लग्न करेन असं तिने सांगितले.

लग्नाबाबत तिच्या कुटुंबीयांना काय वाटतं यावरही भूमीनं भाष्य केले आहे. माझे आईवडील खूप सुधारलेले आहेत. लग्न ही गोष्ट अशी आहे की ती त्यांच्यासोबत चर्चा करु शकत नाही. लग्नासाठी माझी वेगळी चॉइस राहिली आहे.

कोरोनानंतर सेटवरचं वातावरण खूप बदललं आहे. लोक मास्क घालून सेटवर काम करतात. आता लोक एकमेकांसोबत जेवणही शेअर करत नाही असं भूमी पेडणेकर तिच्या शुटींगच्या ठिकाणची परिस्थिती सांगते.

भूमी जेव्हा शुटींगपासून वेळ काढते तेव्हा तिला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतं. ती तिच्या आईला घरातील बॉस मानते. आई-बहिणींसोबत तिला नेहमी वेळ घालवायला आवडतो असं भूमी म्हणते.

भूमीला जेव्हा तिच्या पहिल्या क्रशबद्दल विचारलं तेव्हा तिने पटकन ऋतिक रोशनचं नाव घेतलं. त्यानंतर शाहरुख खान, शाहीद कपूर आणि अमिर खानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं ती सांगते.

कोरोना संक्रमित झाल्यानंतर भूमी पहिल्यासारखी राहिली नाही. चेहऱ्यावरील ग्लो पहिल्यासारखा नाही. केस गळायला लागले. पूर्वीसारखं तब्येत बनवण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असल्याचं भूमी पेडणेकरनं सांगितले.

Read in English