साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:35 IST
1 / 14Weekly Horoscope : या सप्ताहाच्या सुरुवातीला रविवारी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करीत आहे. अन्या कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी शुक्र व हर्षल वृषभ राशीत, रखी व गुरू मिथुन राशीत, बुध कर्क राशीत, मंगळ व केतू सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहू कुंभ राशीत, तर शनी व नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या व तूळ या राशींमधून राहील.2 / 14Weekly Horoscope : गुरुवारी दुर्गाष्टमी आहे. रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी आषाढ शुक्ल चतुर्थी (सकाळी ९:१५ पर्यंत) आहे. सकाळी ६:३४ पर्यंत आश्लेषा, तर त्यानंतर मघा नक्षत्र राहील. सकाळी ६:३४ पासून सिंह रास राहील. दिवस चांगला आहे. राहू काळ सायंकाळी ४:३० ते ६ या वेळेत राहील.3 / 14Weekly Horoscope : नवीन संधी मिळेल : सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला दगदग, धावपळ करावी लागेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. प्रवास घडून येईल. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल. महागड्या वस्तू खरेदी कराल. मंगळवार, बुधवार, गुरुवार थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. शेवटच्या टप्प्यात तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. आरोग्यात सुधारणा होईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.4 / 14Weekly Horoscope : लोकांची साथ राहील : सप्ताहाची सुरुवात खूप उत्साहात होईल. तुमच्या उपक्रमांना लोकांची चांगली साथ मिळेल. अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळेल. आर्थिक प्रश्न सुटतील. नोकरीत एखादी नवीन जबाबदारी मिळेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. मात्र, शुक्रवार, शनिवार षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमणामुळे थोडे सबुरीने वागण्याची गरज राहील. टीप- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.5 / 14Weekly Horoscope : अनुकूल वातावरण राहील: चद्राच्या पराक्रम स्थानापासून ते पच स्थानापर्यंत होणाऱ्या भ्रमणामुळे अनुकूल फळे मिळतील. सुरुवातीला व्यवसायात सतत व्यस्त राहाल. हाती पैसा खेळता राहील. मात्र, गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. तुमच्या इच्छा-आकांक्षा कृतीत उतरतील. शुक्रवार, शनिवार जवळच्या प्रवासाचा योग येईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.6 / 14Weekly Horoscope : भेटीगाठी होतील : मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील. तुमच्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील. अनेक प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मात्र, गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. काहींना प्रवास घडून येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीत बदल होऊ शकतात. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. लोकांना नुसती आश्वासने देऊ नका. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.7 / 14Weekly Horoscope : धनलाभ होईल : तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. अनेक अडचणी दूर होतील. त्यामुळे तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. त्या दृष्टीने मंगळवारपासून अधिक अनुकूल काळ राहील. धनलाभहोण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जुनी येणी वसूल होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडे व जवळच्या नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. स्वतःला सतत कशात ना कशात व्यस्त ठेवाल. टीप- रविवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.8 / 14Weekly Horoscope : लाभ होईल : सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या समोर काही अडचणी असतील. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. रविवार, सोमवार थोडे सबुरीचे धोरण ठेवा. कायद्याचे पालन करा. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे लागतील. मंगळवारपासून परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. तुमच्या प्रयत्नांना यश येईल. शेवटच्या टप्प्यात अकल्पनीय लाभ होतील. तुमच्यावर धनलक्ष्मी प्रसन्न राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.9 / 14Weekly Horoscope : संमिश्र ग्रहमान राहील : संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सुरुवातीला एखाद्या महत्त्वाच्या कामात व्यस्त राहाल. त्यातून पैसाही मिळेल, मात्र, देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मंगळवार, बुधवार, गुरुवार व्यय स्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे आपल्याला काह अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रवासात सतर्क राहा. नियमानुसार कामे करा. खर्चाला आवर घाला. शुक्रवार, शनिवार अडचणीतून बाहेर याल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.10 / 14Weekly Horoscope :भेटीगाठी होतील: जनसंपर्क चांगला राहील. घरात किंवा नातेवाइकांत एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी राहील. बुधवार, गुरुवार तुम्हाला फावला वेळ मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. महत्त्वाची कामे होतील. शुक्रवार, शनिवार प्रवास शक्यतो टाळा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.11 / 14Weekly Horoscope : चांगली बातमी कळेल : भाग्य स्थानापासून ते लाभ स्थानापर्यंत * होणारे चंद्र भ्रमण तुम्हाला अनुकूल राहील. एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. मुले प्रगती करतील. नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. शुक्रवार, शनिवार तुमच्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. टीप- सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.12 / 14Weekly Horoscope : अचानक धनलाभ होईल : सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला थोडी दगदग होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहा. बुधवारपासून भाग्य स्थानातील चंद्रामुळे तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. कलाकार मंडळींना पुरस्कार जाहीर होईल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत अनुकूल बदल होतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे मंडळी येतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.13 / 14Weekly Horoscope : मोहात अडकू नका: मनात नवीन कल्पना विकसित होतील. लोकांच्या भेटीगाठी घेऊन फायदे होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. तरुण वर्गाने मोहापासून दूर राहिले पाहिजे. कुणी तुम्हाला फसवू शकते. शुक्रवार, शनिवार एखादी चांगली बातमी कळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मनावरील ताण निघून जाईल. समाजात तुमचा मान वाढेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. स्वतःचे राहणीमान उंचावण्यावर भर द्या. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.14 / 14Weekly Horoscope : योजना गुप्त ठेवा : या सप्ताहात आपल्याला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. मनात विविध प्रकारचे साधक-बाधक विचार राहतील. हाती घेतलेले प्रकल्प राबविण्यात व्यस्त राहाल. भावनेच्या भरात तुमच्या योजना लोकांना सांगू नका. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंगाचा अनुभव येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. नवीन ओळखीचे फायदे होतील. प्रेमात प्रतिसाद मिळेल. कायद्याची बंधने पाळा. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. टीप-मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.