नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर पंचग्रही योगाचा लाभ; सुवर्ण संधी, बाप्पा शुभ करेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:25 IST
1 / 15चैत्र पौर्णिमेनंतर आता बुधवार, १६ एप्रिल २०२५ रोजी संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे. प्रत्येक मराठी वर्षांतील वद्य पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचे अत्यंत विशेष आणि सर्वोत्तम फल देणारे व्रत केले जाते. याला संकष्ट चतुर्थीचे व्रत म्हटले जाते. हजारो गणेश भक्त न चुकता संकष्ट चतुर्थीचे मनोभावे व्रत करत असतात. 2 / 15रवि मेष राशीत प्रवेश करत आहे. ग्रहस्थिती अशी- रवि मीन राशीतून मेष राशीत जाईल. गुरु आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत आहे. बुध, शुक्र, शनि, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनू राशीतून राहील. 3 / 15हिंदू नववर्षातील पहिली चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी असून, या दिवशी मीन राशीत पंचग्रही योग जुळून येत आहे. तसेच लक्ष्मी नारायण, मालव्य राजयोग असे राजयोगही जुळून येत आहेत. तुमच्यासाठी संकष्ट चतुर्थीचा काळ कसा असेल? जाणून घ्या...4 / 15मेष: प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे आरोग्य विषयक भरपूर त्रास होऊ शकतो. व्यापाऱ्यांना नवीन व्यावसायिक कंत्राट मिळण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होईल. नोकरीत उन्नती व प्रगती होऊ शकते. कार्यरत असलेल्या ठिकाणच्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडू शकते. संबंधावर जास्त लक्ष न दिल्यास दुसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे पैसा खर्च करावा लागू शकतो. कामात खोळंबा झाल्यास ध्यान-धारणा करावी. मानसिक तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल.5 / 15वृषभ: प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. नियमितपणे योगासने व व्यायाम करावा. व्यापाऱ्यांसाठी काहीसा त्रासदायी आहे. मनाप्रमाणे फायदा न झाल्याने मन खट्टू होईल. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम झाल्याने वरिष्ठ त्यांच्यावर प्रसन्न होतील. नोकरी बदलण्याचा विचार सोडून द्यावा. एखादे आर्थिक नुकसान होण्याची संभावना असून त्याने त्रासून जाऊ शकता. विवाहितांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. विद्यार्थ्यांचे अध्ययनाकडे विशेष लक्ष नसेल.6 / 15मिथुन: एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त होऊ शकता. व्यापारात नवीन कंत्राट मिळाल्याने व्यापार अधिक उन्नती करू शकेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीत उन्नतीची संधी प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनातील गैरसमज जोडीदारासह संवाद साधून दूर करण्याचा प्रयत्न करावा. शेअर्स बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. विद्यार्थी सामाजिक माध्यमात जास्त रमतील. जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मन स्थिर ठेवावे लागेल.7 / 15कर्क: व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरू केलात तर तो लाभदायी होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात अहंकार बाजूला न सारल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. घरासाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करू शकता. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल.8 / 15सिंह: बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. व्यापारात प्राप्तीची नवीन साधने मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन व्यापार प्रगती करेल. नोकरी करणाऱ्यांसाठी जास्त मेहनत व संघर्ष करण्याचा काळ आहे. मेहनतीचे फल नक्कीच मिळेल. प्रेमीजनांच्या संबंधात कटुता येण्याची संभावना आहे. विवाहितांनी त्यांच्या संबंधात प्रेम व साधेपणा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे नाते अधिक दृढ होऊ शकेल. जमीन किंवा घर खरेदीत आर्थिक गुंतवणूक करू शकता. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी एखाद्या विषयात मेहनत वाढवावी लागू शकते.9 / 15कन्या: पूर्वीच्या मानाने प्रकृती उत्तम राहील. असे असले तरी काही मानसिक तणाव जाणवेल. व्यापारी घरापासून दूर राहून व्यवसाय करत असतील तर आता ते एखादा नवीन व्यवसाय स्वतःच्या घराजवळ सुरू करू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ सकारात्मक आहे. नोकरी बदलण्याची घाई करू नये. वैवाहिक जीवनातील जुन्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. शेअर्स बाजारात गुंतवणूक करावयाची असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.10 / 15तूळ: व्यापारी व्यवसाय नियमानुसार करून त्यात प्रगती करतील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन काहीतरी शिकावयास मिळू शकते. वैवाहिक जीवनात क्रोधामुळे तणाव वाढू शकतो. अचानकपणे खर्चात झालेली वाढ त्रस्त करू शकते. जमीन किंवा प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी पैसा गुंतवू शकता. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आल्याने ते अध्ययनात पिछाडीवर राहू शकतात.11 / 15वृश्चिक: व्यापारात चांगला लाभ होऊ शकतो. नोकरीत मात्र सावध राहावे लागेल. जेथे काम करता तेथे प्रगती होऊ शकते. प्रेमीजनांचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील. विवाहितांनी वैवाहिक जोडीदाराशी संभाव्य वाद टाळावेत. मन मोकळ्या वातावरणात संवाद साधण्याची गरज आहे. जर रिअल इस्टेटीत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती लाभदायी होऊ शकेल. एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असाल तर ती स्पर्धा आव्हानात्मक असेल.12 / 15धनु: नवीन उमेद व नवीन आनंद घेऊन येणारा काळ आहे. व्यापारासाठी उत्तम कालावधी आहे. व्यापारात उत्साहित व कष्ट करत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे. नोकरीत बदल करण्यासाठी काळ अनुकूल आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेम व खुशीने भरलेले असेल. इतरांना श्रीमंती दाखविण्यासाठी पैसा गरजेपेक्षा जास्त खर्च होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. विद्यार्थ्यांना संशोधन व ज्ञान प्राप्ती हा आठवडा अनुकूल आहे. एखादे मोठे आर्थिक नियोजन करू शकता, परंतु तत्पूर्वी काही आवश्यक खर्च करावे लागतील.13 / 15मकर: व्यापाऱ्यांना व्यवसायानिमित्त भरपूर प्रवास करावे लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. त्यांनी जर नोकरी बदलली तर अति उत्तम . विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. जर शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती दीर्घ काळासाठी करू शकता. उच्च शिक्षण घेण्यासाठी जर मेहनत करत असाल तर त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. परंतु त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल.14 / 15कुंभ: व्यापार व व्यवसायात बहुतांश वेळ मेहनत करण्यातच जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. जर स्वतःच्या जीवनात एकटेच असाल तर आयुष्यात एखादा नवीन जोडीदार येऊ शकतो. विवाहितांसाठी काळ तणावग्रस्त असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आर्थिक चणचण भासणार नाही. विद्यार्थी अभ्यासात रमतील. ते मोठे काही साध्य करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतील. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. मित्र मदत करतील.15 / 15मीन: व्यापार उत्तम चालेल. एखादा नवीन व्यापार सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. शासकीय नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. वैवाहिक जोडीदारास बरोबर कार्य करण्याची एखादी नवीन संधी मिळू शकते. जर कर्ज घ्यावयाचे असेल तर हा सरकारी बँकेकडून कर्ज घेणे जास्त लाभदायी होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. मेहनतीचे चांगले फल मिळेल.