विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:36 IST
1 / 5प्रेमानंद महाराज त्यांच्या अध्यात्मिक प्रवचनासाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहेतच, शिवाय त्यांच्याकडे अनेक सेलिब्रेटी येऊन अध्यात्मिक मार्गदर्शन घेतात, त्यामुळेही लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. विराट-अनुष्काने त्यांच्या दरबारात हजेरी लावल्यापासून चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी दोन तीनदा महाराजांची भेट घेतली असून, यंदाच्या भेटीत विराटच्या गळ्यात तुळशी माळ आढळून आल्याने तो फोटो व्हायरल झाला आहे. 2 / 5वृंदावनच्या भेटीदरम्यान विराटने राधारानीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले. या भेटीत विराटने प्रेमानंद महाराजांकडून 'दीक्षा' घेतल्याची चर्चा आहे. दीक्षा घेणे म्हणजे स्वतःला ईश्वराच्या चरणी अर्पण करणे आणि सात्विक जीवनाचा मार्ग स्वीकारणे.3 / 5या भेटीनंतर विराट कोहलीच्या गळ्यात 'तुळशीची माळ' स्पष्टपणे दिसून आली. हिंदू धर्मात तुळशीची माळ धारण करणे हे भक्ती, शुद्धता आणि मनाच्या शांतीचे प्रतीक मानले जाते. तुळशी माळ तर पवित्र आहेच, पण विराट सारख्या सेलिब्रेटीने महाराजांच्या सांगण्यावरून ती धारण केल्यामुळे सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल होत आहे. 4 / 5विराट आणि अनुष्का नेहमीच ऋषिकेश आणि वृंदावन येथील आश्रमांना भेटी देत असतात. प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात विराट अतिशय साधेपणाने बसलेला दिसला होता. महाराजांनी विराटला जीवनाचे सार आणि भक्तीचे महत्त्व समजावून सांगितले होते. या भेटीचा विराटच्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे बोलले जाते.5 / 5सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी बसून मंत्रमुग्ध होऊन त्यांचे प्रवचन ऐकताना दिसत आहेत. अनुष्का शर्मा देखील आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विराटला नेहमीच प्रोत्साहन देत असते. या जोडीचा हा साधेपणा त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.