1 / 6असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे असते, त्या घरामध्ये श्री हरीची विशेष कृपा असते. अशा घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. त्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा आदरही करतात आणि गुण्यागोविंदानं राहतात.2 / 6तुळशीचा संबंध बुध ग्रहाशी आहे असे जाणकार मानतात. तुळशीवर येणाऱ्या मंजिरीचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. वास्तूमध्ये तुळशीचेही विशेष महत्त्व मानले जाते, ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते.3 / 6जर तुमच्या घरात तुळशीचे रोप सुकायला लागले तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुळशीचे रोप सुकणं हे धनाची हानी होण्याचे लक्षण मानले जाते. यासोबत ते पितृदोषही दर्शवते. असे म्हणतात की अनेकवेळा लावल्यानंतरही तुमच्या घरातील तुळशीचे रोप पुन्हा पुन्हा सुकत असेल तर याचा अर्थ तुम्ही पितरांचे ऋणी आहात. ते दूर करण्यासाठी तुम्ही गरजू लोकांना दान करा आणि त्याच वेळी संत महात्म्यांना भोजन द्या.4 / 6जर तुमच्या घरात तुळशीची पाने अचानक पिवळी पडू लागली तर ते अशुभ चिन्ह मानले जाते. म्हणजे येणाऱ्या काळात तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते किंवा कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते. तुळशीची पाने पिवळी पडल्यावर ही पाने काढून वाहत्या पाण्यात टाकून द्यावीत. तुम्हाला हवे असल्यास रामायण किंवा महामृत्युंजय मंत्राचं घरी पठणही करु शकता. असे केल्याने परिस्थिती चांगली होऊ शकते.5 / 6तुळशीवरील मंजिरी सुकू लागल्यास ती त्वरित काढून टाकावी. तुळशीची मंजिरी सुकायला लागली आणि ती काढली नाही तर झाडावरचा बोजा वाढतो, त्याचप्रमाणे घराच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतो असे म्हणतात. तुळशीवरील सुकलेली मंजिरी काढून नदीत वाहून टाकावी किंवा वाळवून तुळशीच्या दाण्यांप्रमाणे ठेवावी.6 / 6असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप हिरवे असते, त्या घरामध्ये श्री हरीची विशेष कृपा असते. अशा घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. त्या घरात कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांचा आदरही करतात आणि गुण्यागोविंदानं राहतात.