नवीन व्यवसाय सुरू करताय? मग घवघवीत यशासाठी 'या' दिवसाची निवड करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 10:55 IST
1 / 6खाद्य व्यवसायाशी संबंधित तुम्ही व्यवसाय सुरू करू पाहत असाल, जसे की हॉटेल, फूड स्टॉल, किराणा, पोळीभाजी केंद्र, वडापावची लॉरी किंवा अगदी चहाची टपरी, तर हे व्यवसाय सोमवारी सुरु करा. 2 / 6घर, जमीन, प्रॉपर्टी डील, बांधकाम अशा कामासंदर्भात बाप्पाचे नाव घेऊन मंगळवारी व्यवसायाचा श्रीगणेशा करा. 3 / 6शेअर मार्केट गुंतवणूक, हफ्ते, कर्ज, भिशी अशा धन व्यवहाराशी निगडित गोष्टी बुधवारी करा. बुधाचा संबंध धन संपत्तीशी असतो. त्याचा फायदा तुमच्या व्यवसायाला निश्चित होईल. 4 / 6शिक्षण (कोणताही प्रांत- नाच, गाणे, शालेय, कला, व्यवसाय इ.) संबंधित शिकवणीचा विचार करत असाल किंवा धार्मिक कार्याची सुरुवात करत असाल, तर गुरुवार त्यासाठी उत्तम आहे. तुमच्या कार्याला गुरुबळ प्राप्त होऊन कामे वेगाने पुढे जातील. 5 / 6सौंदर्य प्रसाधनांशी निगडित किंवा कला प्रांताशी निगडित गोष्टींची सुरुवात शुक्रवारी करावी. शुक्र हा कला, प्रतिभा, सौंदर्याचा कारक आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर, बुटीक, केश कर्तनालय, कला दालन अशा अनेक गोष्टींना गती मिळू शकेल. 6 / 6जे काम दीर्घ काळापर्यंत सुरू ठेवायचे आहे किंवा ज्याला आपण ड्रीम प्रोजेक्ट किंवा आयुष्यभराची गुंतवणूक म्हणतो तशा गोष्टी, व्यवहार किंवा नोकरी यांची सुरुवात शनिवारी करावी. शनी हा ग्रह चिकाटी देणारा ग्रह आहे. जिद्द कायम ठेवून अडचणींवर मात करण्याचे बळ शनी महाराज देतील.