शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:09 IST

1 / 7
अशाच नियमांपैकी एक नियम म्हणजे, सुतक लागलेल्या घरात अर्थात ज्या परिवारात मृत्यू झाला आहे अशा घरात किमान पहिले तीन दिवस अन्न शिजवले जात नाही. स्वयंपाक केला जात नाही. चहासुद्धा केला जात नाही. त्यामागे काय आहे कारण? चला जाणून घेऊ.
2 / 7
दुःखाचा प्रसंग असला तरी भुकेची वेळ चुकत नाही. अशा वेळी शेजारी पाजारी राहणारी मंडळी पिठलं भाताचा साधा, पण पोटभरीचा स्वयंपाक आणि चहा पाण्याची व्यवस्था करतात. तीन दिवस ही मदत केली जाते, काही जणांकडे तेरा दिवस स्वयंपाक केला जात नाही. पण यामागचे कारण काय?
3 / 7
तर कुटुंबातली व्यक्ती गेल्यामुळे संपूर्ण परिवार शोकाकुल स्थितीत असतो. अशा वेळी स्वयंपाक करण्यात कोणत्याही गृहिणीचे लक्ष लागणार नाही आणि स्वयंपाक केला तरी त्यात चव उतरणार नाही. शास्त्राचा नियम आहे, की मन उद्विग्न असताना स्वयंपाक केला तर स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे भाव अन्नात उतरतात आणि ते अन्न खाणाऱ्यांच्या अंगी लागत नाही.
4 / 7
'जसे अन्न तसे मन' असे म्हटले जाते. मांसाहार तामसी मानला जातो, तसेच परान्नही वर्ज्य मानले जाते, कारण ते अन्न शिजवणारी व्यक्ती कोणत्या मानसिकतेने स्वयंपाक करते हे आपल्याला माहीत नसते, मात्र त्यांनी केलेला पदार्थ सेवन केल्याने आपलीही चित्तवृत्ती पालटू शकते. मात्र सुतक काळात परान्न हे कृतज्ञ भावनेने स्वीकारले जात असे आणि गरजेपुरते सेवन केले जात असे.
5 / 7
सुतक काळात पहिले तीन दिवस घरच्यांची मानसिकता ठीक नसते. हळू हळू दुःख ओसरते आणि मनुष्य आपल्या दैनंदिन कामात व्यग्र होतो आणि स्वयंपाकापासून इतर सर्व कामे करू लागतो. म्हणून या तीन दिवसात नातेवाईकांकडून वा शेजाऱ्यांकडून जेवणाची सोय करून दिली जाते.
6 / 7
तसेच सुतक काळात भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना पाणी दिले जात नाही, वा ते मागतही नाहीत. कारण, त्या काळात घरात भरलेले पाणी सुद्धा नकारात्मक ऊर्जेने भारले जाते. म्हणून तेराव्याचे विधी झाले की घरशुद्धी, जलशुद्धी, अन्नशुद्धी केली जाते आणि गोड पदार्थ भरवून शोकाकुल परिवाराला दुःखातून बाहेर काढले जाते.
7 / 7
म्हणून अन्नशास्त्रानुसार केवळ सुतक काळातच नाही, तर जेव्हा गृहिणी रागावलेली असते, त्यावेळी तिने स्वयंपाक करू नये असा शास्त्रसंकेत आहे. यासाठी घरात नामजप, अन्नपूर्णा स्तोत्र निरंतर सुरु ठेवावे असे म्हटले जाते. तसेच गृहिणीने फार काळ रागवून बसू नये यासाठी पतीने तिची मनधरणी केली पाहिजे, हीसुद्धा पूर्वजांनी शिकवण दिली आहे.
टॅग्स :Traditional Ritualsपारंपारिक विधी