Pradosh Vrat 2023: बुधवारी इंग्रजी वर्षातील पहिला प्रदोष 'या' राशीच्या लोकांसाठी ठरेल भाग्यकारक; करा एकच उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:09 IST
1 / 6प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. प्रदोषव्रतादिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा (उपासानंतरचे भोजन) असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोषव्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्य व्रतादिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल, तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा. उपास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी. 2 / 6हिंदू धर्मात प्रदोष व्रत फार महत्वाचे मानले जाते. हे व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२३ सालचे पहिले प्रदोष व्रत पौष महिन्याच्या त्रयोदशीला बुधवारी ४ जानेवारी रोजी येत आहे. त्रयोदशी तिथी ३ जानेवारी रोजी रात्री १०.०१ मिनिटांनी सुरू होईल आणि ०४ जानेवारी रोजी रात्री ११. ५० मिनिटांनी समाप्त होईल. 3 / 6४ जानेवारी २०२३ चा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. तुमचा आत्मविश्वास आणि कामाप्रती उत्साह वाढेल. स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवाचा फायदा होऊन मोठे नुकसान टळेल. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. जोडीदाराच्या साथीने भविष्यासाठी मोठ्या योजनेची आखणी कराल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. शिव मंदिरात जा किंवा एखाद्या गरजू दाम्पत्याला तांदळाचे दान करा. 4 / 6बुध प्रदोष मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. जुनी दुखणी, दीर्घकालीन आजारातून दिलासा देणारी घटना घडेल. भविष्यातील गुंतवणूक आणि योजना याबद्दल कोणाला माहिती देऊ नका किंवा चर्चाही करू नका, त्यामुळे तुमच्या कामात अडथळा उदभवू शकतो. शिव मंदिरात गेल्यामुळे मनःशांती अनुभवाल. जोडीदाराशी मतभेद असल्यास ते संपुष्टात येतील. प्रदोष काळात अर्थात सूर्यास्ताच्या वेळी शिव महिम्न स्तोत्र पठण अथवा श्रवण करा. 5 / 6४ जानेवारी २०२३ चा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला जाऊ शकतो. घरातील प्रसन्न वातावरण तुम्हाला आनंदी करेल. त्या आनंदाचे कारण तुम्हीच असाल. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी चांगली संधी उपलब्ध होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नफा मिळवता येईल. जोडीदाराला वेळ द्या. नाते संबंध दृढ होतील. शक्य झाल्यास जोडीने अथवा एकट्याने शिव मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या. 6 / 6बुध प्रदोष मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. समाजात प्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना घडतील. त्यामुळे दिवसभर तुम्ही आनंदात असाल. जोडीदाराच्या साथीने नवीन कामाची योजना आखाल आणि भविष्यात ती यशस्वीदेखील होईल. कोणाकडून कर्ज घेऊ नका. शांत डोक्याने आणि प्रामाणिकपणे आपले काम करा. प्रदोष काळात अर्थात सूर्यास्ताच्या वेळी 'ओम नमः शिवाय' हा जप करा.