Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 10:12 IST
1 / 5>> शास्त्र सांगते की, निधन महिना माहीत आहे पण तिथी माहीत नसेल तर त्या महिन्यात दर्शअमावस्या किंवा शुक्ल वा कृष्ण एकादशीच्या दिवशी श्राद्ध करावे.2 / 5>> शास्त्र सांगते की, निधन महिना माहीत आहे पण तिथी माहीत नसेल तर त्या महिन्यात दर्शअमावस्या किंवा शुक्ल वा कृष्ण एकादशीच्या दिवशी श्राद्ध करावे.3 / 5>> बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मागमूस लागून ती व्यक्ती बारा वर्षे परत आली नाही व तिच्या वयोमानाचा अंदाज घेऊन तिच्या मरणाविषयी खात्री झाली तर पालाशविधीने और्ध्वदेहिक करून तो दिवस वार्षिक श्राद्धासाठी घ्यावा. योगायोगाने ती व्यक्ती परत आली, तर त्यासाठी शास्त्रात स्वतंत्र विधी दिलेला आहे.4 / 5>> याउपर सर्वपित्री अमावस्या या तिथीला पितरांची निधन तिथी माहीत असो वा नसो, त्यांच्या नावे श्राद्ध घालून पितृऋण व्यक्त करू शकतो.5 / 5एकूणच काय, तर कोणत्याही गोष्टीसाठी अडून न राहता त्यातून मार्ग काढत पुढे जा, अशी छान शिकवण आपल्याला धर्मशास्त्रातून मिळते. असा धर्म आपण पाळावा आणि धर्माचे रक्षण करत तो वृद्धींगत करावा.