By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 18:22 IST
1 / 8पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे. जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादीचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरू शकते.2 / 8पितृ पक्षात श्राद्ध करणाऱ्या घरातील सदस्याने या दिवसात केस आणि नखे कापू नयेत. त्याने ब्रह्मचर्य देखील पाळावे. अर्थात शरीरसंबंध टाळावेत. 3 / 8जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते.4 / 8पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न दिले पाहिजे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात.5 / 8प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नका. विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका. 6 / 8पितृ पक्षात जर केळीच्या पानावर भोजन करा आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा. 7 / 8पितृ पक्षात लग्न, मुंडण, साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये. किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये.8 / 8असे मानले जाते की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे. मसालेयुक्त पदार्थ टाळावेत.