Pitru Paksha 2021 : काही कारणास्तव श्राद्ध करणे शक्य नसेल तर धर्मशास्त्रात दिलेले पर्याय वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:04 IST
1 / 7सर्वप्रथम मनात पितरांविषयी श्रद्धा असणे ही मूलभूत गोष्ट अत्यावश्यक आहे. ती असल्यानंतर प्राप्त परिस्थितीस अनुसरून शास्त्रातील पर्यायांचा वापर करावा. ज्यावेळी सपिंड श्राद्ध करणे अशक्य असेल तेव्हा पुढील गोष्टी कराव्यात. 2 / 7ब्राह्मण भोजन किंवा अतिथी भोजन शक्य नसेल तर मंदिरात जाऊन गुरुजींना दूध, केळी व दक्षिणा द्यावी. 3 / 7पुरोहित उपलब्ध नसतील तर पितरांचे स्मरण करून दान, दक्षिणा मंदिराच्या दानपेटीत टाकावी किंवा एखाद्या गरजूला द्यावी. 4 / 7पितरांच्या नावे गायीला नैवेद्य अर्पण करावा किंवा चारा खाऊ घालावा. 5 / 7श्राद्धाचा स्वयंपाक करणे शक्य नसेल, तर पितरांच्या तिथीच्या दिवशी आणि तिथी माहित नसल्यास सर्वपित्रीच्या दिवशी आपल्या रोजच्या जेवणातले अन्न स्वत: ग्रहण करण्यापूर्वी देवाला आणि कावळ्याला ठेवावे. 6 / 7पितरांना नैवेद्य अर्पण करताना म्हटला जाणारा मंत्र पाठ नसेल तर दोन्हा हात वर करून पितरांचे स्मरण करून आपली असमर्थता व्यक्त करावी आणि केलेली सेवा गोड मानून घ्या अशी प्रार्थना करावी. 7 / 7थोडक्यात, ज्यांनी आपली परंपरा, संस्कृती जपली, आपल्याला हे जग दाखवले त्या पूर्वजांचे ऋणनिर्देश करताना अडचणी आल्या म्हणून डगमगून न जाता पर्यायी गोष्टींचा वापर करून श्राद्धविधी जरूर करावेत, हाच मूळ हेतू आहे.