1 / 10अंकशास्त्रानुसार, हा महिना शुक्राला समर्पित आहे. शुक्र हा भौतिक सुख देणारा ग्रह असल्यामुळे १-९ मूलांकांना कोणते लाभ देणार ते जाणून घेऊ. ज्यामुळे आर्थिक बाबतीत प्रगती, कौटुंबिक सुख आणि बऱ्याच गोष्टींची बेरीज वजाबाकी शक्य होईल अशी चिन्ह या महिन्यात दिसत आहेत. सविस्तर पाहू!2 / 10तुमची जन्मतारीख १, १०, १९, २८ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक १ असेल. हा महिना आर्थिक बाबींसाठी चांगला राहील आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत लाभ होईल. या महिन्यात, तुम्ही कामाच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक प्रकल्प हाताळण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे महत्त्वाच्या कामांची आखणी करून त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, तरच प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कोणताही मजकूर संदेश किंवा कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा, अन्यथा त्याचा गैरवापर होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात संमिश्र भावनाअसतील. 3 / 10तुमची जन्मतारीख २, ११, २०, २९ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक २ असेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल; तुमच्या वर्तणुकीच्या कौशल्यांद्वारे तुम्ही यश मिळवत राहाल. जीवनात आनंद आणि समृद्धीची शक्यता असेल, आर्थिक बाबतीत प्रगती होईल आणि गुंतवणुकीतून लाभ होईल.जुनी येणी वसूल करता येतील. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल, एखाद्या सहलीचे आयोजन कराल. जून अखेरीस काही समस्या उद्भवतील, ज्या संवादातून सहज सोडवता येतील. मित्रांची साथ मिळेल. 4 / 10तुमची जन्मतारीख ३,१२,२१,३० यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ३ असेल. या महिन्यात, तुमच्या प्रेम जीवनात आनंदाचे क्षण येतील आणि नशीब तुमचे दार ठोठावेल. या महिन्यात तुमच्या आयुष्यात तुमच्या इच्छेनुसार बदल होतील आणि आर्थिक बाबी हळूहळू सुधारतील. संपत्तीत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी वाढू शकतात. जूनमधील न्यायालयीन प्रकरणांचा तुमच्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. जूनच्या अखेरीस, परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही तुमच्या वर्तणुकीच्या कौशल्यांनी तुमच्या आयुष्यात बरेच काही साध्य करू शकाल.5 / 10तुमची जन्मतारीख ४,१३,२२,३१ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ४ असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. प्रेम जीवनात परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. कुटुंबाला पुरेपूर वेळ देता येईल. सहलीची आखणी केली जाईल. आर्थिक बाबतीतही संपत्ती वाढण्याची शक्यता आहे आणि शुभ परिणाम मिळतील. जून महिन्यात केलेली कोणतीही नवीन गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळ शुभ परिणाम देईल. जूनच्या शेवटी, मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ होऊ शकेल, अशा वेळी एकट्याने कुढत न बसता योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. 6 / 10तुमची जन्मतारीख ५,१४,२३ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ५ असेल. आर्थिक बाबींसाठी काळ अनुकूल आहे, संपत्ती वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, जी गुंतवणुकीच्या दृष्टीनेही लाभदायी ठरेल. कामाच्या ठिकाणीही प्रगतीचा मार्ग हळूहळू मोकळा होईल आणि पगारवाढीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार होईल. प्रेमसंबंधात काही समस्या येतील. ज्यामुळे व्यक्तिगत आयुष्य ढवळून निघेल. सबुरीने घ्या, गरज पडेल तिथे मौन पाळा, परिस्थिती नियंत्रणात येईल. जूनच्या अखेरीस आनंद आणि समृद्धीची परिस्थिती निर्माण होईल. 7 / 10तुमची जन्मतारीख ६,१५,२४ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ६ असेल. जून महिना प्रेम जीवनासाठी एक सुंदर महिना आहे. जोडीदाराबरोबर तुमचे परस्पर प्रेम वाढेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्यासाठी लग्नाच्या शुभ शक्यता वाढू शकतात. संततीसौख्य लाभेल. आर्थिक वाढीची शक्यता आहे. संपत्तीत वाढ होण्याची शुभ चिन्ह आहेत. प्रवासातूनही तुम्हाला आनंददायी परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी योग्य तिथे मौन पाळले तर अनेक प्रश्न आपोआप सुटतील. जूनच्या शेवटी, जीवनात अनेक बदल दिसून येतील आणि वेळ अनुकूल होईल.8 / 10तुमची जन्मतारीख ७,१६,२५ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ७ असेल. या महिन्यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. गुंतवणुकीचे शुभ परिणाम मिळू शकतात आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता देखील असेल. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगती होण्याची शक्यता आहे आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर मतभेद वाढू शकतात किंवा तुमच्यात अंतर वाढू शकते. जूनच्या शेवटी, वडिलांच्या किंवा धार्मिक व्यक्तीच्या आशीर्वादाने, तुम्हाला जीवनात आनंद आणि समृद्धी मिळेल, तुमचे मन आनंदी राहील.9 / 10तुमची जन्मतारीख ८,१७,२६ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ८ असेल. जून महिन्यात तुमच्या प्रेम जीवनात स्थैर्य येईल आणि परस्पर समंजसपणा देखील वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल, परंतु काही लोक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. या महिन्यात तुमचा बॉस देखील तुमच्यावर खूप वर्चस्व गाजवेल, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय काम करू शकणार नाही. सबुरीने घ्या, तुमचीही वेळ येईल. जर तुम्ही बहुआयामी दृष्टिकोनाने आर्थिक बाबींमध्ये गुंतवणूक केली तर लाभ होईल. जूनच्या अखेरीस परिस्थिती हळूहळू सुधारेल आणि मन आनंदी होईल.10 / 10तुमची जन्मतारीख ९,१८,२७ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ९ असेल.जून महिन्यात कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. या महिन्यात तुमचा जोडीदारही तुमच्याकडे खूप लक्ष देईल. प्रेम जीवनासाठी हा महिना रोमान्सचा वर्षाव करणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी योग्य संभाषणाद्वारे कोणतीही परिस्थिती हाताळणे उचित ठरेल. आर्थिक बाबींमध्ये कोणतीही नवीन गुंतवणूक या महिन्यात खर्च वाढवू शकते, तूर्तास नवे खर्च टाळा. जूनच्या अखेरीस, परिस्थिती सुधारतील आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन बाबींवर नियंत्रण मिळवू शकाल.