शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' आहेत भाग्यशाली जन्मतारखा, ज्यांच्यावर असतो ईश्वरी वरदहस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:44 IST

1 / 9
अर्थात, भाग्य लाभणे एवढे पुरेसे नसते तर नशिबाला प्रयत्नाची आणि प्रयत्नांना नशिबाची जोड असेल तरच व्यक्ती नावलौकिक मिळवते. त्यामुळे पुढे दिलेले भाकीत वाचून तुम्ही जर भाग्यशाली तारखांमध्ये असाल तर नशिबाला प्रयत्नांची जोड द्या आणि तुमच्या तारखा यात नसतील तर प्रयत्न वाढवा. हा संदेश लक्षात ठेवून अंकशास्त्राचे भाकीत जाणून घेऊया.
2 / 9
ज्या व्यक्तींचा मूलांक १, ३, ५ आणि ६ असतो, त्या भाग्यशाली समजल्या जातात. त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, संधी आणि दैवी कृपा यांचा अखंड प्रवाह असतो. काही विशिष्ट जन्मतिथी तर अत्यंत भाग्यशाली आणि थेट ईश्वरी आशीर्वादाने परिपूर्ण! कोणत्या ते पाहू.
3 / 9
हा शक्तिशाली मूलांक सूर्यदेवाच्या प्रभावाखाली येतो. या व्यक्ती जगात राजाप्रमाणे आयुष्य जगतात! त्यातही १९ आणि २८ या तारखा अतिभाग्यवान समजल्या जातात. १९ तारखेला मुकेश अंबानी, बिल क्लिंटन यांच्यासारखी नेतृत्व क्षमता आणि दूरदृष्टी धोरणी व्यक्तिमत्त्व लाभले तर २८ तारखेला रतन टाटा, एलोन मस्क, धीरूभाई अंबानींसारखे यशस्वी उद्योगपती लाभले.
4 / 9
या मूलांकावर गुरु ग्रहाची अर्थात बृहस्पतीची कृपा असते. यांचा सल्ला नेहमीच ज्ञानवर्धक आणि फायदेशीर ठरतो! या मूलांकामध्ये १२ आणि ३० जन्मतारखा विशेष भाग्यशाली ठरतं. उदाहरणार्थ १२ तारखेला जेफ बेझोस या जगातील मोठ्या ई-कॉमर्स कंपनीचे मालकाचा वाढदिवस असतो तर ३० तारखेला हेनरी फोर्ड, वॉरेन बफे या आपापल्या क्षेत्रातले शिखर सर केलेल्यांचा वाढदिवस असतो.
5 / 9
या मूलांकावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. हे उत्तम संवाद कौशल्य असलेले आणि जलद विचार करणारे असतात! या मूलांकानुसार १४ आणि २३ या तारखा विशेष भाग्यकारक समजल्या जातात. जसे की १४ तारीख सोशल मीडियाचा जनक मार्क झुकेरबर्ग, तसेच २३ तारीख सुसान वोज्स्की - लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या CEO यांचा त्या तारखेला वाढदिवस असतो.
6 / 9
या मूलांकावर शुक्र ग्रहाची कृपा असते. हे सर्वात भाग्यवान लोक असतात! सौंदर्य, कला आणि प्रेम यांच्याशी यांचा विशेष संबंध असतो! या मूलांकानुसार १५ आणि २४ या तारखा विशेष भाग्यकारक असतात. १५ ला माधुरी दीक्षितचा तर २४ ला सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो
7 / 9
मूलांक १ कडे आत्मविश्वास आणि नेतृत्व हे गुण असतात तर मूलांक ३ कडे ज्ञान आणि सकारात्मकता हे गुण असतात. या मूलांकाच्या व्यक्तींचा सल्ला घेणे नेहमीच फायद्याचे असते! ते योग्य मार्गदर्शन करू शकतात.
8 / 9
मूलांक १ यांच्याकडे उत्तम नेतृत्व क्षमता असते, तर मूलांक ५ कडे उत्तम संवाद कौशल्य असते आणि मूलांक ६ कडे समर्पणाची भावना असते. असे लोक व्यावसायिक भागीदारीसाठी उत्तम असतात!
9 / 9
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ तारखेला झालेला असतो, त्यांच्यावर केतू ग्रहाची विशेष कृपा असते. त्यांची अंतर्ज्ञान शक्ती खूप तीक्ष्ण, अचूक आणि भविष्यवेधी असते! अशा लोकांशी बोलताना विचार करून बोला! कारण ते जे काही बोलतात ते ९९% सत्य होण्याची शक्यता असते! चांगले किंवा वाईट, यापेक्षा त्यांना एक प्रकारची दैवी वाणी प्राप्त झालेली असते.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्र