शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ganesha Jayanti 2023: गणेश जयंतीदिवशी करा हे साधे सोपे उपाय, सर्व क्लेष दु:खांपासून होईल मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:30 IST

1 / 7
हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. यावर्षी गणेश जयंती २५ जानेवारी रोजी साजरी होणार आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरद तिलकुंद चतुर्थी, गणेश जयंती आणि माघी विनायकी चतुर्थी या नावाने ओळखले जाते.
2 / 7
गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी आणि वरद तिलकुंद चतुर्थी या नावांनी ओळखले जाते. या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केली जाते.
3 / 7
यावेळी गणेश जयंती दिवशी खास योगायोग बनलेला आहे. कारण, गणेश जयंतीच्या दिवशी बुधवार आहे. अशा परिस्थितीत या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही नोकरी, व्यापार, आरोग्य या संबंधीच्या व्याधींपासून सुटका करून घेऊ शकता.
4 / 7
गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश द्वादश नाम स्तोत्रमचं पठण केलं पाहिजे. असं सांगतात की, याचं पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सारं काही शुभ घ़़डतं.
5 / 7
घरामध्ये सुख-समृद्धीसाठी गणेश जयंतीच्या दिवशी काशाची थाळी घेऊन त्यामध्ये चंदनाने ओम गं गणपतये नम असं लिहा. त्यानंतर या थाळीमध्ये पाच बुंदीचे लाडू ठेवून कुठल्याही गणपतीच्या मंदिरामध्ये दान करा. असे केल्याने भगवान श्री गणेशांची कृपा तुमच्यावर होईल.
6 / 7
श्री गणेशांची कृपा होण्यासाठी त्यांना दुर्वा अर्पण केल्या पाहिजेत. गणेश जयंतीच्या दिवशी दुर्वांची प्रतीकात्मक गणेशमूर्ती देवाऱ्यात स्थापन करावी. त्यांची विधिवत पूजा करावी. असे केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते. तसेच घरातून क्लेश-कलह दूर होतात.
7 / 7
जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत असेल किंवा बुध दोष निवारण करून घ्यायचं असेल तर गणेश जयंती दिवशी पूर्ण भक्तिभावानिशी पूजा करा. ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने लवकरच लाभ होतो.
टॅग्स :Maghi Ganesh Jayantiमाघी गणेश जयंतीspiritualअध्यात्मिक