Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:52 IST
1 / 6श्रीमंती हे केवळ स्वप्न न ठेवता ते ध्येय बनवून जगा. रोजच्या दिनचर्येत केलेले छोटेसे बदल तुम्हाला रातोरात श्रीमंत करतील. मात्र त्यासाठी चाणक्यनीतीमध्ये दिलेल्या पुढील पाच सवयी अंगिकाराव्या लागतील. 2 / 6चाणक्य नीतीनुसार, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जे लोक आजचे काम उद्यावर ढकलतात, त्यांच्याकडे लक्ष्मी कधीही टिकत नाही. कष्टाळू व्यक्तीला आज नाही तर उद्या नक्कीच यश मिळते. मेहनतीचा कोणताही पर्याय नसतो, हे नेहमी लक्षात ठेवा.3 / 6ज्या व्यक्तीचे बोलणे गोड असते, तिच्याकडे लोक आकर्षित होतात आणि तिची कामे सहज पूर्ण होतात. कटू बोलणाऱ्या व्यक्तीच्या घरात नेहमी क्लेश असतो आणि अशा ठिकाणी लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक आणि प्रेमाने बोलावे.4 / 6वेळेची किंमत जाणणारा माणूस कधीही अपयशी होत नाही. जे लोक वेळेचा आदर करतात, वेळ त्यांचा आदर करते. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देऊ शकतो.5 / 6चाणक्य म्हणतात की, संपत्तीचा वापर केवळ उपभोगासाठी न करता भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्यावा. जी व्यक्ती कमावते कमी आणि खर्च जास्त करते, ती लवकरच संकटात सापडते. संकटकाळात केवळ तुमची बचतच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरते.6 / 6आपल्या उत्पन्नातील काही भाग गरजूंच्या मदतीसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च करावा. दानामुळे संपत्ती कमी होत नाही, तर ती वृद्धिंगत होते आणि समाजात मान-सन्मान वाढतो.