By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 10:54 IST
1 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील अनेक ज्येष्ठ नेते, अभिनेते, कलाकार आणि उद्योगपतींना रामललाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रणे पाठवली जात आहेत. या भव्य कार्यक्रमात अयोध्या मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तिथे जाताना पेहरावाचा आधी विचार करा. 2 / 5रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर शक्यतो पारंपरिक वेषातच जा. पुरुषांनी धोतर आणि कुर्ता किंवा कुर्ता पायजमा परिधान करावा. कारण हिंदू धर्मात पूजेच्या वेळी धोती-कुर्ता घालण्याची परंपरा आहे. या नेत्रदीपक सोहळ्याचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर भारतीय पोषाखच हवा. 3 / 5महिलांनी देखील भारतीय पोषाखच करावा. शक्यतो साडी नेसावी आणि साडीची सवय नसेल तर पंजाबी ड्रेस किंवा तत्सम वेष करावा. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशन म्हणून घातलेले फाटके आणि तोकडे कपडे घालून मंदिरात जाऊ नये. त्या वास्तूची पवित्रता जपणे हे आपले कर्तव्य आहे. 4 / 5हिंदू धर्मात पूजाविधीच्या वेळी तसेच देवदर्शाच्या वेळी काळा रंग निषिद्ध मानला गेला आहे. त्यानुसार मंदिरात जातानाही काळ्या कपड्यांचा वापर शक्यतो टाळावा, जेणेकरून इतक्या दूर गेल्यावर तिथे आपली कपड्यांच्या रंगावरून अडवणूक होणार नाही आणि देवदर्शनही छान होईल. 5 / 5काही नियम हे अलिखित असतात, अर्थात आपणच समजूतदारीने ते पाळायचे असतात. अलीकडे वस्त्र परिधान कसे करावे हे सांगावे लागत आहे हे दुर्दैव! त्यामुळे अयोध्येच्या भूमीवर तसेच अन्य कोणत्याही मंदिरात जाताना आपण स्वतःवर नियम लावून घेऊया आणि आपल्या संस्कृतीचे पावित्र्य जपूया!