शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: पावसाचे पाणी दूर करू शकते वाढते कर्ज, आर्थिक अडचणी, व्यवसायात नुकसान; करा 'हे' उपाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2023 10:23 IST

1 / 5
कर्जातून मुक्त होण्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ज्योतिषशास्त्रात पावसाच्या पाण्याबाबत अनेक विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. पावसाच्या पाण्याने वाढती कर्ज आणि आर्थिक संकटावर कशी मात करता येईल ते जाणून घेऊया.
2 / 5
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात नुकसान होत असेल तर पावसाचे पाणी पितळ्याच्या भांड्यात जमा करावे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी या पाण्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अभिषेक करावा. यामुळे व्यवसायात नुकसान होणे कमी होऊन प्रगती सुरु होईल.
3 / 5
जर एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभावामुळे कर्जाचा बोजा वाढत असेल तर त्यांच्यासाठी पावसाचे पाणी खूप चमत्कारी ठरू शकते. हे पाणी एखाद्या कलशात साठवून हनुमानाला अर्पण करा. तसेच संपूर्ण श्रावण मासात हनुमान स्तोत्र म्हणून हा उपाय दर मंगळवारी किंवा शनिवारी करा.
4 / 5
जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून बाहेर येत नसेल तर पावसाचे पाणी मातीच्या भांड्यात गोळा करून घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल.
5 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार पैशाची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचे पाणी पातेल्यात जमवावे. ज्या सकाळी पाऊस नसेल आणि सूर्यदर्शन होईल त्यावेळी हे पाणी सूर्यप्रकाशात ठेवून, इष्टदेवतेचे नाव घेऊन घरात शिंपडावे. लक्ष्मी मातेची कृपा होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष