शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्या श्रावण सोमवारी वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांची गर्दी; पायरीचे दर्शन घेत वाहिली ब्लिवपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 6:06 PM

1 / 6
वैद्यनाथ मंदिराच्या पायरीवर बिल्व पत्र अर्पण करून श्री वैद्यनाथाचे शेकडो भाविकानी दर्शन घेतले.
2 / 6
सध्या जिल्ह्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे पहिल्या श्रावण सोमवारी फारसी गर्दी नव्हती.
3 / 6
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी बंद होते. गेल्या वर्षी सुद्धा कोरोना पार्श्वभूमीवर हे मंदिर श्रावण सोमवारी बंदच होते.
4 / 6
या परिसरातील प्रती वैजनाथ मंदिर ,दक्षिण मुखी गणपती मंदिर व जगमित्र नागा मंदिराचेही भाविकांनी दुरून दर्शन घेतले.
5 / 6
हिंदू धर्मात श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. प्रभु श्री वैद्यनाथच्या दर्शनासाठी येथे दर श्रावण सोमवारी राज्य ,परराज्यातून भाविकांची संख्या लाखाच्या घरात असते. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून मंदिर बंद आहेत.
6 / 6
या श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी ही मंदिर बंद आहे.वैद्यनाथ मंदिर परिसरात बिल्वपत्र,प्रसाद साहित्य, खेळणी दुकानावर यात्रेकरूंची गर्दी होती. भाविक मास्क घालून दर्शनासाठी आले होते. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर रोडवर वाहतूक ठप्प होत आहे.
टॅग्स :BeedबीडShravan Specialश्रावण स्पेशल