By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 12:05 IST
1 / 10बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आपली सुंदर फिगर आणि सेक्सी स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असते. माध्यामांवर दिशा नेहमीच आपल्या ग्लोईंग स्किनचे फोटो टाकत असते. तसंच दिशा हेल्दी डाएट सुद्धा फॉलो करते. आपल्या ग्लोईंग स्कीनचं सिक्रेट काय आहे याबाबत दिशा नेहमी सांगते. 2 / 10आज आम्ही तुम्हाला दिशा पटानीच्या स्किन आणि फिगरचं गुपीत सांगणार आहोत. दिशा पटानीने आपल्या सुंदरतेमागे घरगुती उपायांचा हात आहे असं सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत दिशाच्या सुंदरतेचे खास घरगुती फंडे.3 / 10आपली त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी दिशा खूप पाणी पिते. आपली बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी दिशा दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिते. जास्त पाणी प्यायल्यामुळे तिच्या त्वचेवर ग्लो येतो. दिशा बाहेरचं खाणं शक्यतो टाळते. आपली त्वचा चांगली ठेवण्यासाठी दिशा खूप पाणी पिते.4 / 10दिशा त्वचेला चांगलं ठेवण्यासाठी क्लिजरचा वापर करते. कारण ग्लोईंग स्किनसाठी मॉईश्चराईज करणं गरजेचं आहे. आपल्या त्वचेला पोषण मिळण्यासाठी आणि हेल्दी ठेवण्यासाठी दिशा दुधाची साय त्वचेला लावून त्वचा चांगली ठेवते. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करते.5 / 10योगा आपली फिगर चांगली ठेवण्यासाठी दिशा योगा करते. आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओ दिशा सोशल मिडीया अकाऊंटवरून पोस्ट करत असते. त्यामुळे तीची बॉडी अत्यंत वेलशेप्ड असते. 6 / 10दिशा आपल्या त्वचेसोबतच केसांची सुद्धा काळजी घेत असते. त्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर केसांवर करते. आपल्याला सगळ्यांनाच बदामाच्या तेलातील पोषक घटकांबद्दल माहित आहे. दिशा याचा वापर करून आपले केस सुंदर ठेवते. 7 / 10आपल्या फॅन्सना सुद्धा दिशा योगा करण्याचा सल्ला देते. तुम्हाला सुद्धा दिशाप्रमाणेच ग्लोईंग लूक हवा असेल तर योगा करून मिळवू शकता. 8 / 10दिशा आपल्या आकर्षक आणि बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेच असते. 9 / 10दिशा आपल्या आकर्षक आणि बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेच असते. 10 / 10दिशा आपल्या आकर्षक आणि बोल्ड फोटोमुळे सतत चर्चेच असते.