फाटलेले ओठ लूक बिघडवत असतील तर, हॉट आणि आकर्षक ओठांसाठी 'या' खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 12:36 IST
1 / 10सगळ्यानाच आपले ओठ सुंदर आणि चांगले हवे असतात. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. अनेकदा आपण महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतो. पण त्यामुळे सुद्धा कधीही उपयोग होत नसतो.2 / 10ओठ सुंदर आणि चांगले नसतील चेहरा आणि त्वचेचा लूक खराब होत असतो. ओठांना पोषण मिळालं नाही तर ओठ सुकतात. आणि त्वचा निघण्यास सुरूवात होते. 3 / 10आज आम्ही तुम्हाला खास टीप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या ओठांची काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते तेलाचे प्रकार आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही सुंदर सॉफ्ट ओठ मिळवू शकता. 4 / 10बादामाचं तेल- बदामाच्या तेलात व्हिटामीन ई असतं. त्यामुळे ओठांना नैसर्गिकरित्या चमक देण्यासाठी बदामाचं तेल फायदेशीर ठरत असतं. त्यासाठी तेल गरम करून ते नाभीला लावा. त्यामुळे काळे आणि फाटलेले ओठ मुलायम होण्यास मदत होईल. 5 / 10नारळाचं तेल- नारळांच तेल केसांसाठी खूप फायदेशीर ठरत असतं हे तुम्हाला माहीत असेल. पण ओठांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. घरात सहज वापरात असलेलं नारळाचं तेल ओठ चांगले राहण्यासाठी ओठांना लावून रात्रभर ओठ तसेच राहू द्या.6 / 10तुपाचा वापर करा- नाभीमध्ये तुप लावणे त्वचेसाठी फायदेशीर असतं. अनेक वर्षापासून लोक नाभीमध्ये तुप लावत आहेत. कारण त्यामुळे त्वचा चांगली राहते. त्यासोबतच ओठ मऊ आणि मुलायम होतात. 7 / 10राईचं तेल- राईचं तेल ओठांना व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. त्यासाठी रात्री झोपताना राईचं तेल ओठांना लावून झोपाल तर फरक दिसून येईल. 8 / 10कडुलिंबाचं तेल -कडुलिंबाच्या तेलात अनेक एंटी बॅक्टेरीअल गुण असतात. तसंच त्यात एंटी ऑक्सीडंट्स सुद्धा असतात. त्यासाठी झोपण्याआधी कडूलिंबाच्या तेलाचा वापर करा. 9 / 10लिंबाचं तेल-लिंबाच्या तेलात विटामीन सी असंत. हे तेल नाभीमध्ये लावल्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो. त्वचा निस्तेज निर्जीव दिसत नाही. 10 / 10ऑलिव ऑईल-ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी आणि ओठांसाठी लाभदायक ठरत असतं. ऑलिव्ह ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन ई असतं. त्यामुळे ओठांवर ते तेल लावल्यास चमक टिकून राहते.