नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
1 / 8वाहनांचा इतिहास खूप जुना आहे, एवढी मॉडेल आजवर आलीत आणि त्यापैकी बरीच काळाच्या पडद्याआड लुप्तही झाली. तरीही आजही अनेक कार शौकिनांकडे शंभर शंभर वर्षे जुन्या कार आहेत. त्यांची यथेच्छ बडदास्तही ठेवली जाते. अनेकांना अशा अँटीक कारचे आकर्षण असते, परंतू ती एवढी जुनी असून देखील परवडू शकत नाहीत एवढी महागडी असतात. 2 / 8जगात अशी एक कार आहे, जी सर्वात लहान आहे आणि सर्वाधिक मायलेजही देणारी आहे. तिच्या नावे गिनिज बुकमध्ये रेकॉर्डही आहे. या कारचे नाव आहे Peel P50 (पील पी50) आणि याचा मालक आहे अॅलेक्स ऑर्चिन. 3 / 8अॅलेक्स जेव्हा ही कार चालवितो तेव्हा लोक त्याची थट्टा मस्करी करतात. परंतू एका लीटरमध्ये ही कार एवढे अंतर तोडते की अन्य कारना यासाठी दोन- तीन लीटर पेट्रोल लागेल. 4 / 8Peel P50 चे मुख्य आकर्षण तिची साईज आहे. या कारची लांबी 134 cm, रुंदी 104 cm आणि उंची 120 cm आहे. या कारचा वेग ताशी 56.32 किमी आहे. या कारने ऑर्चिनने गेल्या वर्षी पूर्ण ब्रिटनचा प्रवास केला. 5 / 8जिथे जिथे ही कार जाते तिथे तिथे लोक मागे वळून वळून पाहतात. या कारला २०१० मध्ये जगातील सर्वात छोटी कार म्हणून गिनिज बुकमध्ये गौरविले गेले. 6 / 8या कारमध्ये 4.5 hp चे इंजिन लावलेले आहे. यामुळे ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये ४२ किमीचे अंतर कापते. Peel P50 ला पहिल्यांदा १९६० मध्ये बनविण्यात आले होते. परंतू, नंतर तिचे उत्पादन बंद केले होते. 7 / 8२०१० मध्ये पुन्हा ही कार बनविण्यास सुरुवात झाली. या कारची किंमत एवढी आहे की, १४ सेलेरिओ कार येतील. पी ५० ची किंमत 84 लाख रुपये आहे. 8 / 8भारतातही अशाच शेपमधील एक कार येत आहे. इलेक्ट्रीक. Strom R3 असे तिचे नाव असून तिला बंपर बुकिंग मिळाले आहे. आता या कारची प्रत्यक्षात येण्याची प्रतिक्षा आहे.