फोर्ड, टोयोटा सोडून सलमानने निस्सानची पॅट्रोल कार का निवडली? 72 वर्षांचा इतिहास, इम्पोर्ट केली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:31 IST
1 / 10गँगस्टरांकडून मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने एक जबरदस्त कार खरेदी केली आहे. ही कार फोर्ड, टोयोटा सारख्या कंपन्यांची नाही तर जगविख्यात निस्सान कंपनीची आहे. ही कार बुलेटप्रूफ आहे, परंतू यात अनेक प्रकारची फिचर्स आहेत. 2 / 10सलमान खानला या कारमध्ये प्रवास करताना काही दिवसांपूर्वी स्पॉट केले गेले होते. जपानी कार निर्माता कंपनी निस्सान भारतात एवढे पाऊल रोवू शकली नाहीय. परंतू, सलमानने हीच कार का निवडली असेल? कारण तिच्यात खूप गोष्टी आहेत... 3 / 10महत्वाचे म्हणजे ही कार भारतात विकली जात नाही. सलमान खानने ही कार खास परदेशातून मागविली आहे. ही कार गल्फ कंट्री आणि अन्य अशियाई बाजारात खूप प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बुलेट प्रूफ शिवाय ही कार चांगली खपते. भारतातील सलमानच्या जिवाला धोका पाहता ही कार कस्टमाईज करण्यात आली आहे. 4 / 10Nissan Patrol मध्ये, कंपनीने 5.6-लीटर V8 पेट्रोल इंजिन वापरले आहे जे 405hp पॉवर आणि 560Nm टॉर्क जनरेट करते. टोयोटाच्या फॉर्च्युनरपेक्षा ही एसयुव्ही दुप्पट ताकद निर्माण करते. यावरून तुम्हाला या कारच्या ताकदीचा अंदाज आलाच असेल. 5 / 10फोर-व्हील ड्राइव्ह, 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह रियर-लॉकिंग डिफरेंशियल सिस्टिम देखील देण्यात आली आहे. Nissan Patrol कार ही काही आताच आलेली नाहीय. तर या कारचा इतिहास खूप जुना आहे. 6 / 10जागतिक बाजारात निस्सान पॅट्रोल कारने जवळपास ७२ वर्षांपूर्वी एन्ट्री केली होती. फर्स्ट जनरेशनला १९५१ मध्ये लाँच करण्यात आले होते. सलमानकडे या कारची सहावी पिढी आहे. या कारचे आणखी एक व्हेरिअंट आहे, त्यात 4.0-लीटर V6 पेट्रोल हे कमी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. हे व्हेरीअंट युएईच्या बाजारात विकले जाते. 7 / 10Nissan Patrol च्या केबिनमध्ये लेदर स्टिअरिंग, गिअरनॉब देण्यात आले आहे. आउटसाईड एअर टेंपरेचर डिस्प्ले, मॅप पॉकेट, प्रायव्हसी ग्लॉस, लाईट अॅडजेस्टर, बोस ऑडिओ सिस्टिम, १३ स्पिकर, दुसऱ्या सीटवर ७ इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. 8 / 10SUV ला हिल डिसेंट कंट्रोल, रियर सीट बेल्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, हिल डिसेंट कंट्रोल, लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन सिस्टम (SIPS), ब्लाइंड स्पॉट आदी सुरक्षा प्रणाली आहे. 9 / 10ABS (BSD), हिल होल्ड कंट्रोल, पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), ट्रॅक्शन कंट्रोल, इंजिन इमोबिलायझर, अँटी थेफ्ट अलार्म सारखी नेहमीची सुरक्षा वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत. 10 / 10सलमान खानकडे टोयोटा लँड क्रूझरदेखील आहे. या एसयूव्हीमध्ये बुलेटप्रूफ चष्मा देखील देण्यात आला आहे. ही एसयुव्ही देखील बुलेटप्रूफ आहे. लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी आणि ऑडी आर7 स्पोर्टबॅक अशा कारदेखील त्याच्याकडे आहेत.