१ लाख रुपये भरा आणि घरी घेऊन जा Maruti ची नवी कोरी ७ सीटर CNG गाडी; पाहा किती असेल EMI
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:39 IST
1 / 10Maruti Suzuki 7 Seater Car : सध्या देशात 7 सीटर गाड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक अन्य पर्यायांकडे वळताना दिसतायत. सध्या इलेक्ट्रीक कार्सची (Electric Cars) किंमत तुलनेनं जास्त असल्यामुळे आता लोक सीएनजी गाड्यांकडेही वळत आहेत. 2 / 10सध्या बाजारपेठेत सीएनजी वाहनांना प्रचंड मागणी आहे. अशा परिस्थितीत मारुती अर्टिगा सीएनजी (Maruti Suzuki Ertiga CNG) ची मागणी बाजारात खूप आहे. जर तुम्हाला जास्त मायलेज, कमी किमतीची फॅमिली कार घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची अर्टिगा ही कार चांगला ऑप्शन आहे.3 / 10सध्या बाजारपेठेत सीएनजी वाहनांना प्रचंड मागणी आहे. अशा परिस्थितीत मारुती अर्टिगा सीएनजी (Maruti Suzuki Ertiga CNG) ची मागणी बाजारात खूप आहे. जर तुम्हाला जास्त मायलेज, कमी किमतीची फॅमिली कार घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची अर्टिगा ही कार चांगला ऑप्शन आहे.4 / 10जर तुम्हाला मारूतीची सीएनजी अर्टिगा कार विकत घ्यायची असेल तर १ लाख रुपयांचं डाऊनपेमेंट करून त्यावर तुम्हाला किती ईएमआय लागेल याची माहिती घेऊ. तसंच या कारमध्ये कोणते फीचर्स मिळतायत हे देखील आपण पाहणार आहोत.5 / 10मारुती सुझुकीची प्रसिद्ध MPV कार Ertiga देखील CNG किटसह येते. कंपनीने या कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. या कारचं CNG व्हेरिअंट 92PS ची पॉवर आणि 122Nm टॉर्क जनरेट करते. 6 / 10या कारचं CNG व्हेरिअंट केवळ VXI या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 7-इंचाचं इन्फोटेनमेंट सिस्टम, एलईडी टेल लॅम्प, फॉग लॅम्प, प्रोजेक्टर हेडलॅम्प, व्हेंटिलेटेड फ्रंट कप होल्डर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात आलं आहे.7 / 10याशिवाय इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), मागील सीटसाठी एसी व्हेंट्सही देण्यात आले आहेत आहेत. तसंच कारमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर सारखे फीचर्सही उपलब्ध आहेत. या कारमध्ये 60 लिटर क्षमतेची सीएनजी टाकी देण्यात आली आहे.8 / 10याच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 7.81 लाख रुपयांपासून सुरू होते, परंतु VXI CNG व्हेरिएंटची किंमत 9.87 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. कंपनीचा दावा आहे की ही कार 26.08 किमी/किलो पर्यंत मायलेज देते.9 / 10Maruti Ertiga CNG VXI ची किंमत 9.87 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होत असून जर तुम्ही त्यासाठी 1 लाख रुपये डाऊन पेमेंट केले, तर कार देखो EMI कॅल्क्युलेटरनुसार 9.8 टक्के व्याज दरानुसार 5 वर्षांसाठी प्रति महिना 21113 रुपये ईएमआय असेल.10 / 10मारुती एर्टिगाच्या CNG मॉडेलला फायनॅन्स केल्यानंतर ग्राहकांना ५ वर्षांसाठी जवळपास २ लाख ६८ हजार ४८० रूपयांचं व्याज आकारलं जाईल. अन्य बँकांमध्ये व्याज दर निराळे असू शकतात. त्यानुसार ईएमआय आणि व्याज म्हणून जाणारी रक्कम बदलू शकते.