शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

OLA चा बिग धमाका! सिंगल चार्जमध्ये सर्वाधिक ३२० किमी रेंज देणारी स्कूटर लॉन्च, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:47 IST

1 / 10
देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादक कंपनी OLA नं बाजारात एक नवीन जनरेशन स्कूटर लॉन्च केली आहे. OLA च्या थर्ड जनरेशन मॉडेलची ही नवी स्कूटर आहे. कंपनीने आतापर्यंत ४ व्हेरिएंट्स बाजारात आणले आहेत. ज्याची सुरुवातीची किंमत ७९,९९९ रुपये इतकी आहे.
2 / 10
आता त्याच OLA कंपनीनं इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये S1 Pro Plus लॉन्च केली आहे. जी देशातील सर्वात जास्त ड्रायव्हिंग रेज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर असेल. ओलाचे फाऊंडर आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही घोषणा केली आहे.
3 / 10
भाविश अग्रवाल म्हणाले की, नव्या थर्ड जनरेशन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्यात अन्य मॉडेलपेक्षा अधिक उत्तम सुविधा आहेत. आम्ही पुन्हा एकदा नंबर वन इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड बनलो आहोत. आता इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये कंपनीचा वाटा २५ टक्के इतका आहे. सेकंड जनरेशन मॉडेलच्या २ व्हेरिएंट S1 X, S1 X pro यांचीही विक्री सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.
4 / 10
नव्या थर्ड जनरेशनमध्ये काय खास? - ओला इलेक्ट्रिक कंपनीने म्हटलं की, नवं थर्ड जनरेशन मॉडेल पूर्णत: नव्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. त्यात नवीन पॉवरट्रेनचा वापर करण्यात आला आहे. त्यात हबलेस मोटर ऐवजी नवीन मिड ड्राईव्ह इलेक्ट्रिक मोटर पाहायला मिळेल.
5 / 10
मिड ड्राईव्ह इलेक्ट्रिक मोटरमध्ये कंट्रोल यूनिट आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही एका बॉक्समध्ये फिट करण्यात आलं आहे. ही नवीन पॉवरट्रेन पहिल्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग रेंज देईल. त्याशिवाय कंपनीनं या नव्या मॉडेलमध्ये बेल्ट ड्राईव्ह ऐवजी चेन ड्राइव्हचा सिस्टमचा वापर केला आहे. ज्यामुळे स्कूटरचा परफॉर्मेंस अधिक चांगला होईल.
6 / 10
या चेन ड्राईव्हच्या साऊंडसाठी कंपनीने काम केले आहे. सेंकड जनरेशन मॉडेल स्कूटरमध्ये बेल्ट ड्राईव्ह देण्यात आले आहेत. ओलाच्या नवीन स्कूटरमध्ये पेटेंटेड ब्रेक बाय वायर टेक्नोलॉजी वापरली आहे जी कुठल्याही सामान्य दुचाकीप्रमाणे ब्रेक वापरला जाऊ शकतो. त्यातून काइनेटिक एनर्जीतून उष्णता मिळते, त्याने ब्रेक पॅडचं आयुष्य वाढते आणि माइलेजवरही परिणाम दिसून येतो.
7 / 10
OLA S1 X - ओलाच्या थर्ड जनरेशन बेस मॉडेल S1X मध्ये एकूण ३ बॅटरी पॅक मिळतात, त्याची किंमत क्रमश: ७९,९९९ रुपये, ८९,९९९ रुपये आणि ९९,९९९ रुपये आहे. याचं इलेक्ट्रिक मोटर 7KW पीक पॉवर जनरेट करते. टॉप स्पीड १२३ किमी प्रति तास असून सर्वात मोठा बॅटरी पॅक सिंगल चार्जमध्ये २४२ किमी ड्रायव्हिंग रेंज देण्याची क्षमता ठेवते.
8 / 10
OLA S1 X+ ओला एक्स १ मॉडेलमध्ये कंपनीने केवळ 4kwh बॅटरीसह लॉन्च केली आहे. या स्कूटरमध्ये 11kW पीक पॉवर जेनरेट केले जाते. त्याची किंमत १,०७,९९९ रुपये इतकी आहे. त्याचं टॉप स्पीड १२५ किमी प्रति तास असून ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये २४२ किमी ड्रायव्हिंग रेंज देते असं कंपनीने सांगितले.
9 / 10
OLA S1 Pro - ओला एक्स १ प्रो मध्ये कंपनीने २ बॅटरी पॅक दिलेत, ज्याची किंमत १,१४,९९९ रुपये आणि १,३४,९९९ रुपये आहे. यात 4kwh बॅटरी पॅक ११ kw पीक पॉवर जेनरेट करते. ही स्कूटर २.७ सेकंदात ० ते ४० किमी प्रति तास वेग घेऊ शकते. ही स्कूटरही सिंगल चार्जमध्ये २४२ किमी धावू शकते.
10 / 10
OLA S1 Pro + - ओलाची थर्ड जनरेशनची सर्वात महाग मॉडेल S1 Pro Plus आहे. कंपनीने यात 4kwh, 5kwh अशा २ बॅटरी पॅकसह लॉन्च केली आहे. ज्याची किंमत १,५४,९९९ रुपये आणि १,६९,९९९ इतकी आहे. यात डुअल चॅनेल एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह अनेक एडवान्स फिचर्स दिलेत. ही देशातील सर्वात पॉवरफुल इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जिचं टॉप स्पीड १४१ किमी प्रति तास असून ही सिंगल चार्जमध्ये सर्वाधिक ३२० किमी ड्रायव्हिंग रेंज देते.
टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर