नेक्स्ट जेन Skoda Octavia होणार लाँच; सध्याच्या मॉडेलवर मिळतेय 8 लाखांपर्यंतची सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 15:46 IST
1 / 15देशातील नावाजलेली वाहन कंपी Skoda भारतीय बाजारात आपली स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी कंपनीनं कंबरही कसली आहे.2 / 15कंपनीनं नुकतंच Skoda Octavia या कारचं प्रोडक्शन सुरू केलं आहे. तसंच लवकरच ही कार बाजारात लाँचही केली जाणार आहे.3 / 15परंतु या कारचं जुनं व्हर्जन अद्यापही बाजारात उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीनं Skoda Octavia RS245 वर बंपर डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे.4 / 15सध्या कंपनी Skoda Octavia RS 245 चं नवं व्हेरिअंट लाँच करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे Skoda Octavia RS 245 चा स्टॉक अजूनही बाजारात अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. 5 / 15कंपनीनं ही कार गेल्या वर्षी लाँच केली होती. ऑटोकारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कंपनी या कारच्या डिलरशिपद्वारे स्टॉक करण्यासाठी यावर 8 लाख रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर करत आहे. 6 / 15प्रीमियम सेडान सेगमेंट ही कार जबरदस्त पॉवरसाठी प्रसिद्ध आहे. हे कंपनीद्वारे सादर केलेले दुसरे आरएस मॉडेल आहे.7 / 15यापूर्वी 2017 च्या सुरुवातीला कंपनीने आरएस 230 हे मॉडेल लाँच केलं होतं. 8 / 15परंतु त्या मॉडेलच्या तुलनेत नव्या मॉडेलमध्ये मोठ्या चाकांसह नवीन इंजिन देखील वापरण्यात आलं आहे. 9 / 15कंपनीने ही कार लिमिटेड नंबरमध्ये लाँच केली, त्यानंतर ती बंद करण्यात आली. तथापि, काही डीलरशिपमध्ये स्टॉकमध्ये ही कार उपलब्ध आहे.10 / 15 Skoda नं या कारमध्ये 2.0 लिटर क्षमतेचं 4 सिलिंडर असलेलं जबरदस्त इंजिन दिलं आहे. हे इंजिन 245PS ची पॉवर आणि 370Nm चा टॉर्क जनरेट करते. 11 / 157 स्पीड ड्युअलल क्लच ट्रान्समिशन गिअरबॉक्स असलेल्या या कारमध्ये 9 एअरबॅग्स, 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर, पॅसेंजर्स सीट, 8 इंचाचा टचस्क्रिन, लेदर सीट आणि 12.3 इंचाचं डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे.12 / 15जबरदस्त इंजिन आणि फीचर्स असलेल्या या कारची एक्स शोरूम किंमत 35.99 लाख रूपये आहे.13 / 15 गेल्या ऑटोएक्सपोमध्ये पहिल्यांदा कंपनीनं ही कार लाँच केली होती आणि एप्रिल 2020 पर्यंत या कारची विक्री झाली होती. 14 / 15परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक डिलरशीपकडे अजूनही या कारचा स्टॉक आहे. 15 / 15सध्या कंपनी या कारच्या नेक्स्ट जनरेशनवर काम करत आहे. लवकरच ती कारही लाँच केली जाईल. (टिप: यात देण्यात आलेली माहिती ही मीडिया रिपोर्ट्सच्या आधारावर आहे. काही ठिकाणी ही कार उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे. देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये डिलरशीपनुसार याची किंमत निराळी असू शकते.)