By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:17 IST
1 / 10Maruti Suzuki Car Price increase: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट (Swift) कारची किंमत वाढविली आहे. 2 / 10याचबरोबर जे ग्राहक पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे कंपनीची सीएनजी फिटेड वाहने खरेदी करू इच्छुक आहेत. त्यांना देखील जादा पैसे खर्च करावे लागणार आहेत. मारुतीने बीएसई फायलिंगमध्ये ही घोषणा केली आहे. 3 / 10मारुती सुझुकीने सीएनजीच्या गाड्यांची किंमत देखील वाढविली आहे. याचे कारण कंपनीने उत्पादन खर्च वाढल्याचे दिले आहे. मारुती सुझुकीने या मॉडेलच्या किंमती 15000 रुपयांपर्यंत वाढविल्या आहेत. या वाढलेल्या किंमती सोमवारपासूनच लागू होणार आहेत. 4 / 10कंपनीने सांगितले की, अन्य मॉडेलच्या किमतींमध्ये देखील वाढ केली जाणार आहे. या मॉडेलची किंमत वाढ नंतर कळविली जाणार आहे. 5 / 10मारुती सुझुकीनेच नाही तर अन्य कार निर्मात्यांनीदेखील उत्पादन खर्च वाढल्याने आपल्या कारच्या किंमती वाढविल्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर या वाढलेल्या किंमती कार कंपन्यांच्या विक्री किती प्रमाणात प्रभावित करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 6 / 10मारुतीच्या सध्या 6 कार सीएनजी फिटेड आहेत. यामध्ये WagonR (वॅगनआर), Celerio (सेलेरियो), S-Presso (एस-प्रेसो), Ertiga (अर्टिगा), Alto 800 (ऑल्टो 800) आणि Eeco (ईको) या फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसोबत येतात. 7 / 10जूनच्या महिन्यात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सर्व सेगमेंटचा खप ग्रीन झोनमध्ये आहे. 8 / 10कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा उत्पादन, मागणी आणि विक्रीवर ब्रेक लागला होता. नवीन मॉडेलदेखील लाँच झाल्याने वाहन उद्योग पुन्हा ट्रॅकवर येण्यास मदत झाली आहे. 9 / 10मारुती सुझुकीने जून महिन्यात 1,65,576 युनिट्स उत्पादित केली होती. मे मध्ये 40,924 एवढ्या गाड्याच उत्पादित झाल्या होत्या.10 / 10मारुतीची डिझायर ही कॉम्पॅक्ट सेदान देखील पुढील काळात सीएनजीमध्ये मिळणार आहे. यानंतर स्विफ्ट कारदेखील सीएनजीमध्ये येणार आहे.