Maruti Alto CNG वर भन्नाट ऑफर! फक्त ५० हजार भरा अन् कार घरी न्या; पाहा, सर्व डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 14:10 IST
1 / 9सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सार्वकालिक उच्चांकावर आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने भारतातील इंधनदर १२ ते १५ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2 / 9सततच्या इंधनदराच्या वाढीमुळे हजारो ग्राहक आता CNG या पर्यायाकडे वळताना दिसत आहेत. ग्राहकांच्या मागणीमुळे अनेकविध कंपन्या आपल्या कार, वाहने CNG पर्यायांत उपलब्ध करत आहेत. मारुती सुझुकी ही कंपनीही त्यापैकीच एक आहे. 3 / 9Maruti Suzuki कंपनीने आपल्या अनेक कार CNG पर्यायात सादर केल्या आहेत. Maruti Suzuki Alto 800 देशातील सर्वात स्वस्त पॉप्यूलर गाड्यांपैकी एक आहे. ही ग्राहकांमध्ये फॅमिली कार म्हणून पसंत केली जाते. याची किंमत, जबरदस्त मायलेज, शानदार लूक, चांगली रिसेल व्हॅल्यू असणे हे ग्राहकांना आवडत आहे. 4 / 9Maruti Suzuki Alto 800 ही कार CNG पर्यायातही येते. जर तुम्हाला मारुती सुझुकी ऑल्टो ८०० LXI S-CNG मॉडलची किंमत ४.८९ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. तुम्ही याला ५० हजार रुपयाची डाउन पेमेंट करून कार खरेदी करू शकता.5 / 9Maruti Suzuki Alto 800 दोन व्हेरियंट मध्ये एलएक्सआई आणि एलएक्सआई (ओ) वर सीएनजी पॉवरट्रेन ऑप्शन मिळते. ईएमआय कॅलक्यूलेटरनुसार, ५ वर्षांसाठी ८ टक्के व्याज सोबत तुमचा ईएमआय ९८९५ रुपये होईल. या ५ वर्षासाठी तुम्हाला एकूण १० लाख ५ हजार ६६३ रुपये व्याज म्हणून द्यावे लागेल.6 / 9Maruti Suzuki Alto 800 ला दोन व्हेरियंट मध्ये एलएक्सआई आणि एलएक्सआई (ओ) वर सीएनजी पॉवरट्रेन ऑप्शन मिळते. मारुती सुझुकी ऑल्टो ८०० सीएनजी एलएक्सआय व्हेरियंटमध्ये बॉडी कलरचे बंपर्स, बॉडी कलर डोर हँडल, स्टियरिंग व्हील वर सिल्वर एक्सेंट सोबत ड्युअल टोन इंटिरियर, एसी विद हीटर, पॉवर स्टियरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळते.7 / 9Maruti Suzuki Alto 800 एलएक्सआय एस-सीएनजी मॉडल वर सेफ्टी फीचर्समध्ये ड्रायव्हर साइड एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ईबीडी सोबत एबीएस, स्पीड अलर्ट सिस्टम आणि ड्राइवर आणि सह-ड्राइवर साठी सीट बेल्ट रिमाइंडरचा समावेश आहे. एलएक्सआई (ओ) व्हेरियंटमध्ये ऑल्टो 800 एलएक्सआय सीएनजी व्हेरियंट वर फ्रंट पॅसेंजर एअरबॅग मिळते.8 / 9गेल्या अनेक वर्षांपासून Maruti Suzuki देशातील पहिल्या क्रमांकाची कार विक्री करणारी कंपनी ठरत आहे. मारुतीच्या कारची १ ते सव्वा लाख युनिटची प्रति महिना विक्री होताना पाहायला मिळत आहे. स्वदेशी असो किंवा विदेशी, मारुतीच्या आसपासही कोणती कंपनी नाही.9 / 9मारुती सुझुकीच्या काही अपवाद वगळता जवळपास सर्वच कार प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. इतकेच नाही तर, मारुतीच्या कारने एकापेक्षा एक विक्रीचे उच्चांकही नोंदवले आहेत. मारुतीच्या कारचा बोलबाला कायमच भारतीय बाजारावर असलेला पाहायला मिळत आहे.