Maruti Alto चा येतोय नवीन अवतार! किंमत स्वस्त पण फिचर्स दमदार; एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 19:54 IST
1 / 9गेल्या अनेक महिन्यांपासून Maruti Suzuki देशातील पहिल्या क्रमांकाची कार विक्री करणारी कंपनी ठरत आहे. मारुतीच्या कारची १ ते सव्वा लाख युनिटची प्रति महिना विक्री होताना पाहायला मिळत आहे. मारुतीच्या आसपासही कोणती कंपनी नाही. स्वदेशी असो किंवा विदेशी.2 / 9Maruti बलेनोचे फेसलिफ्ट नवीन व्हर्जनची बुकिंग अलीकडेच कंपनीने सुरू केले आहे. लवकरच ही कार विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. मात्र, आतापर्यंत देशात सर्वाधिक खपाची ठरलेली Maruti Alto आता नवीन अवतारात भारतीय ग्राहकांसमोर सादर केली जाणार आहे.3 / 9Maruti Alto न्यू जनरेशन लवकरच लॉंच केली जाणार आहे. मारुती सुझुकी अल्टो फॅमिली कार म्हणून प्रचंड लोकप्रिय असून, याची किंमत आणि खर्च कमी आहे. उत्तम मायलेजही ही कार देत असल्याने ग्राहक या कारला सर्वाधिक पसंती देत आहेत. 4 / 9Maruti Alto च्या न्यू जनरेशन मॉडेलमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात. याच्या इंटिरियरला जास्त प्रीमियम बनवले जाणार आहे. मात्र, इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही, असे सांगितले जात आहे. लीक झालेल्या फोटोवरून या हॅचबॅकचा बॉक्सी स्टांस कायम ठेवले जाणार आहे.5 / 9Maruti Alto च्या न्यू जनरेशन मॉडेलच्या ओव्हरऑल लांबी आणि रुंदीमध्ये बदल केला जाणार नाही. कारमध्ये नवीन ग्रील, हेडलँम्प्स आणि बंपर दिले जावू शकते. कारची उंची काहीशी वाढवली जाऊ शकते.6 / 9Maruti Alto 2022 मध्ये कंपनीचे हलके Heartect प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. हाच प्लॅटफॉर्म मारुती स्विफ्ट, डिझायर आणि अर्टिगा मध्ये वापर केला जावू शकतो. यात ७ इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिला जावू शकतो. 7 / 9यात नवीन इंस्ट्रूमेंट कलस्टर, चारही पॉवर विंडो आणि कीलेस एन्ट्री सारखे फीचर्स दिले जावू शकते. सीएनजी किट शिवाय, कार मध्ये स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजी मिळू शकते, अशी चर्चा आहे. 8 / 9स्टँडर्ड सेफ्टी फीचर्सच्या रुपाने ड्युअल एअरबॅग, स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, एबीएस (अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम) सोबत ईबीडी (इलेक्ट्रिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन) आणि ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर सीटबेल्ट रिमाइंडरचा समावेश होईल.9 / 9Maruti Alto न्यू जनरेशनमध्ये कारमध्ये आधीच ७६९ सीसीचे ३ सिलिंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळू शकतो.