शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

२ लाख भरा अन् गुढीपाडव्याला घरी आणा Maruti Baleno; जाणून घ्या, किती असेल EMI?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 11:02 IST

1 / 6
मारूती सुझुकी बलेनो ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ज्याची एक्स शो रुम किंमत ६.५६ लाख रुपयांपासून सुरू होते. ज्यांना कुणाला चांगला लूक आणि लेटेस्ट फिचर्ससह फॅमिली कार खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी बलेनो एक उत्तम पर्याय आहे.
2 / 6
बलेनो देशातील बेस्ट सेलिंग कार आहे. त्याचा अल्फा व्हेरिएंट लूक सर्वांना पसंत आहे. त्यामुळे त्याची विक्री जास्त होते. तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी बँकाकडून वाहन कर्जही घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काही रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागेल.
3 / 6
जर तुम्ही २ लाख रुपये डाऊनपेमेंट करून बलेनो अल्फा व्हेरिएंटसाठी बँकेकडून कर्ज घेत असाल तर त्यानंतर तुम्हाला किती कर्ज घ्यावे लागेल आणि दरमहिना किती EMI भरावा लागेल यासह सर्व आवश्यक बाबी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
4 / 6
मारुती सुझुकी बलेनोच्या टॉप सेलिंग व्हेरिएंट बलेनो अल्फाची एक्स शोरुम किंमत ९.२८ लाख रुपये आणि ऑन रोड किंमत १० लाख ४८ हजार ५६० रुपये इतकी आहे. जर तुम्ही २ लाख डाऊनपेमेंट केले तर त्यासाठी तुम्हाला ८ लाख ४८ हजार ५६० रुपये कर्ज घ्यावे लागेल.
5 / 6
मारुती सुझुकी अल्फा व्हेरिएंट बलेनोसाठी ५ वर्षांचं कर्ज घेतले तर त्यावर व्याज दर ९% आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील ६० महिन्यांसाठी १७,६१५ रुपये EMI म्हणून भरावे लागतील. Baleno Alpha वर २ लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटसह ५ वर्षांपर्यंतचे कर्ज घेतल्यास २ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज लागेल.
6 / 6
मारुती सुझुकी बलेनोच्या अल्फा व्हेरियंटचे मायलेज २२.३५ kmpl आहे. ५ सीटर कार मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल सीट्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, अलॉय व्हील आणि ABS यांसारख्या प्रमुख वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.