शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Anand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 13:52 IST

1 / 10
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची मोठी प्रिमिअम एसयुव्ही XUV700 काही दिवसांतच लाँच होणार आहे. यासाठी कंपनी मोठी तयारी करत आहे.
2 / 10
कंपनी सतत या एसयुव्हीचे वेगवेगळे फोटो आणि एखादे फीचर सोशल मीडियावर हवा करण्यासाठी टाकत आहे. यामुळे लोकांमध्ये देखील उत्सुकता वाढू लागली आहे.
3 / 10
मात्र, नुकताच या कारच्या रुपड्याचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोवरून लोकांनी XUV700 ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लाँचिंगआधीच एसयुव्ही फेल होते की काय टेन्शनमध्ये आनंद महिंद्रांची कंपनी आहे. (Mahindra XUV700 photos leaked ahead of launch)
4 / 10
काही वर्षांपूर्वी टोयोटाबाबतही असेच झाले होते. टोयोटा हॅचबॅक कार आणणार या उत्साहाने लोकांनी लिवासाठी 50 हजार हून अधिक बुकिंग केल्या होत्या. परंतू कार लाँच होताच लोकांचा भ्रमनिरास झाला.
5 / 10
फोटोतील लूकवरून लोकांनी धडाधड बुकिंग रद्द केले. आज लिवापेक्षा इनोव्हा आणि फॉर्च्युनर रस्त्यावर जास्त दिसतात. तशीच परिस्थिती XUV700 बाबत घडण्याची शक्यता आहे.
6 / 10
XUV700 चे नवे फोटो लीक झाले आहेत. हे फोटो पाहून लोक निराश दिसत आहेत. XUV700 ला एका मोठ्या फुगलेल्या लूकमध्ये दाखविण्यात आले आहे.
7 / 10
इंटीग्रेटेड एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स आणि ब्लॅक आऊट ग्रिलसोबत टियरड्रॉप हेडलॅम्प्स दिसत आहेत. याशिवाय फॉग लँम्प हाऊसिंग, एअर डॅम, स्किड प्लेट सोब फ्रंट बंपर चांगला दिसत नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.
8 / 10
पाठीमागे रुफलाईनचा स्लोप एंड, इंटीग्रेटेड रूफ स्पॉइलर आणि अँग्युलर डिटेल्स सोबत मोठे टेललँप आहेत. यामुळे एक्सयुव्ही 700 च्या डिझाईनला मस्क्युलर डिझाईनचे रुप दिसते.
9 / 10
या मॉडेलचे अलॉय व्हील खूप छोटे दिसत आहेत. दुसरी बाब म्हणजे XUV700 ला महिंद्राच्या कॉपर पेंटद्वारे रंगविलेले आहे, यामुळे ही कार कोणत्याही कोणातून आकर्षक दिसत नसल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कारची किंमत 14 लाख एक्स शोरुम असू शकते.
10 / 10
महिंद्राने Alturas G4 ही प्रमिअम एसयुव्ही भारतीय बाजारात उतरवली होती. फोर्डच्या एंडेव्हर आणि टोयोटाच्या फॉर्च्युनरला टक्कर देण्य़ासाठी ही कार आणली होती. परंतू, ग्राहकांनी या कारकडे पाठ फिरविली आहे.
टॅग्स :Mahindraमहिंद्राAnand Mahindraआनंद महिंद्रा