By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:20 IST
1 / 6गेल्या काही काळापासून कारबाजारात महिंद्रा एका थरथराट उडवून देईल अशा एका एसयुव्हीवर काम करत आहे. या नव्या एसयुव्हीचे फोटो व्हायरल झाल्याने नेटवर अंदाजपंचीचा उत आला आहे. 2 / 6कोण म्हणतेय थार स्पोर्ट आहे, कोण म्हणतेय बोलेरोचे पुढचे रुप आहे. तर कोण म्हणतेय महिंद्राची डिफेंडर आहे. काही थार प्रेमींनी तर रॉक्सची बुकिंगही थांबविली आहे. 3 / 6अनेकजण अंदाज लावून थकलेत, कधी येतेय याची वाट पाहत बसलेत. पण जी काही कार येणार आहे तिचा लूक पाहून लोकांचे डोळे आपोआप तिकडे वळतील एवढ्या ताकदीची आहे. 4 / 6महिंद्राचे सध्या जोरदार लक सुरु आहे. जुन्या कारचे रुपडे पालटून महिंद्रा एसयुव्हींचा राजा बनला आहे. मग ती ३एक्सओ असो की थार रॉक्स... महिंद्राने लोकांना आपल्याकडेच खिळवून ठेवले आहे. यामुळे टाटा, टोयोटाच नाहीतर ह्युंदाई, किया सारख्या कंपन्यांनाही महिंद्राचा ग्राहक खेचून आणता येत नाहीय.5 / 6काही वर्षांपूर्वी नुसतेच बॉक्सी लुक आणून पाहणाऱ्यांना विटाळ आणणारी महिंद्रा आता स्पोर्टी, मस्क्युलर आणि भपकेबाज लुक देऊ लागली आहे. मग ती त्यांची ईलेक्ट्रीक कार असोत की स्क़ॉर्पिओ, महिंद्राने या सर्वांचे रुपडे पालटले आहे. 6 / 6 आता जी कार येत आहे, ती कुठे कुठे थार, डिफेंडर, मारुतीची जिम्नी आणि बाजुने स्कॉर्पिओ सारखा फिल देत आहे. यामुळे जो ज्या अंगलने पाहिल त्याला त्याच्या मनातली कार दिसेल असेच काहीसे महिंद्रा करणार आहे.